महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अनेक वर्षापासून साजरा केला जातोय 'जागतिक दिव्यांग दिन', समस्या मात्र कायम...

दरवर्षी 3 डिसेंबरला 'जागतिक दिव्यांग दिन' साजरा केला जातो. दिव्यांगांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हा या दिवसाचा उद्देश आहे.

WORLD DISABILITIES DAY
दृष्टी दिव्यांग अशोक आठवले यांनी मांडली व्यथा (Source - ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : 23 hours ago

बीड : 'जागतिक दिव्यांग दिन' हा 3 डिसेंबर रोजी राज्यासह देशात आणि जगात साजरा केला जातो. मात्र, दिव्यांगांच्या समस्या या अनेक वर्षांपासून कायम आहेत. दृष्टिहीन दिव्यांग, अस्थिभंग दिव्यांग, कर्णबधिर दिव्यांग असे विविध प्रकार दिव्यांगांमध्ये आहेत. या दिव्यांगांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी बच्चू कडूसारख्या नेत्यानं पुढाकार घेतला. मात्र, दिव्यांगांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. अपंग मंत्रालयाची स्थापना झाल्यानंतरही या समस्या तशाच आहेत.

दिव्यांगांचा हक्काचा दिन : "दृष्टिहीन दिव्यांग, कर्णबधिर दिव्यांग, अस्तिव्यंग दिव्यांग आणि सर्वच दिव्यांगांच्या विकासासाठी स्वावलंबनाला चालना देण्यासाठी 'दिव्यांग दिन 3 डिसेंबर 2024 रोजी साजरा केला जाणार आहे. भोपाळमध्ये गॅस वायु गळती झाली होती. या वायू गळतीमुळं सर्वसामान्य कुटुंबातील अनेकांना दिव्यांगपण आलं, त्यांना अभिवादन करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे मार्च महिन्यात 'दिव्यांग दिन' साजरा होत होता. मात्र, त्यानंतर 3 डिसेंबरला 'दिव्यांग दिन' साजरा करावा, अशी संकल्पना दृढ झाली," असं अंध दिव्यांग अशोक आठवले यांनी सांगितलं. जागतिक संदर्भात बेल्जियमच्या खाणीतील स्फोटानंतर अपंग दिन साजरा करण्यात येत असल्याचं दाखले मिळतात.

दृष्टी दिव्यांग अशोक आठवले यांनी मांडली व्यथा (Source - ETV Bharat Reporter)

दिव्यांग दिनाची संकल्पना :"भारतामध्ये 2011 च्या जनगणनेनुसार, दिव्यांगांची संख्या 2 कोटीच्या आसपास आहे. त्यापैकी महाराष्ट्रात 20 लाख दिव्यांग आहेत. दिव्यांगांच्या विकासाला गती मिळावी, ही या दिवसाची खरी संकल्पना आहे. प्रत्येक ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या ठिकाणी दिव्यांगांसाठी राखीव म्हणून ठेवण्यात आलेला 5% निधी त्यांच्यासाठी खर्च करावा. हा निधी प्रत्येक दिव्यांगापर्यंत पोहोचला पाहिजे. या निधीचा वापर दिव्यांगांच्या विकासासाठी झालेला नाही. दिव्यांग व्यक्तींसाठी मोठमोठ्या इमारती बांधल्या, मात्र या ठिकाणी रॅमची व्यवस्था, ब्रेल लिपीची व्यवस्था नाही. दिव्यांग अधिकार अधिनियम 2016 याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली, तरच खरा दिव्यांग दिन साजरा झाला असं म्हणता येईल," असं अशोक आठवले यांनी स्पष्ट केलं.

काय आहे ब्रेल लिपी : ब्रेल लिपीबाबत अशोक आठवले म्हणाले, "ब्रेल लिपी ही दृष्टी दिव्यांगांना सुशिक्षित करण्यासाठी असते. ब्रेल लिपीची निर्मिती लुईस ब्रेल यांनी केली. दिव्यांगांना ज्ञान देण्यासाठी ब्रेल लिपीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. ब्रेल लिपीच्या जोरावर महाराष्ट्रातील अनेक तष्टी दिव्यांग सध्या बाहेरच्या राज्यात जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अनेक दिव्यांग लोक चांगल्या पदावर काम करताना पाहायला मिळतात. सर्वसामान्य माणूस हा देवनागरी लिपीच्या जोरावर आपल्या आयुष्यात बदल घडवतो, तसं अंध दिव्यांग हा ब्रेल लिपीच्या जोरावर आपल्या आयुष्यात बदल करू शकतो. अशाप्रकारे ब्रेल लिपीचे अंध व्यक्तीच्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे."

दिव्यांगांच्या काय आहेत समस्या :अशोक आठवले म्हणाले, "दिव्यांग दिनानिमित्त मला असं सांगावं वाटतं की, त्या गोष्टीचा खेद देखील वाटतो. ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत स्तरावर पंचायत समिती स्तरावर, नगरपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका जिल्हा परिषद स्तरावर शासनाकडून दिला जाणारा 5% निधी हा दिव्यांगांना दिला पाहिजे. दिव्यांगांना या पाच टक्के निधीचा लाभ अजूनपर्यंत देखील मिळालेला नाही. दिव्यांग हक्क अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी झालेली नाही. दिव्यांग दिनाची खरी पूर्तता जर करायची असेल, तर यासाठी प्रत्येक दिव्यांगाला त्याचे हक्क अधिकार मिळवून दिले पाहिजेत. राज्यात दिव्यांग मंत्रालय हे गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये चालू झालं. या मंत्रालयामार्फत दिव्यांगांची भरती झालेली नाही. फक्त जाहिराती दिल्या आहेत, मात्र भरती झालेली नाही. अनेक दिव्यांगांना आपल्यासाठी मंत्रालय झालय याची कल्पना देखील नाहीये."

हेही वाचा

  1. एकनाथ शिंदे सत्तेबाहेर राहण्याच्या विचारात? अजित पवारांच्या भूमिकेमुळे शिंदेंची बार्गेनिंग पॉवर घसरली
  2. कंगाल व्हायचं असेल तर शिव्या देत राहा, 'या' ग्रामपंचायतीचा अनोखा ठराव
  3. साताऱ्यातील वडूजचे चित्रकार संजय कांबळे यांची आर्ट सोसायटी ऑफ इंडिया मुंबईच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

ABOUT THE AUTHOR

...view details