मुंबईUNESCO World Heritage List : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट होण्यासाठी प्रत्येक देश नामांकनं पाठवतो. यावर्षी मराठाकालीन किल्ल्यांचा प्रस्ताव भारताकडून युनेस्कोकडं पाठवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा, यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं युनेस्कोला नामांकन पाठवलं आहे. या किल्ल्यांमध्ये साल्हेर, शिवनेरी , लोहगड, खांदेरी , रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजय दुर्ग, सिंधुदुर्ग किल्ल्यांचा समावेश आहे.
42 वारसा स्थळांचा युनेस्कोच्या यादीत समावेश : 2024-25 साठी, भारतानं युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत मराठाकालीन किल्ल्यांचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. 'हे' किल्ले सतराव्या ते एकोणिसाव्या शतकात बांधले गेले होते. महत्त्वाचं म्हणजे भारतातील 42 वारसा स्थळांचा सध्या युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील तीन सांस्कृतिक स्थळांचा समावेश आहे.
युनेस्कोच्या प्रतिष्ठेच्या व्यासपीठावर महाराष्ट्राला नामांकन मिळणं, अत्यंत अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या नामांकनासाठी पहिलं पाऊल टाकलं आहे. रयतेचं शौर्य, पराक्रम, कल्याणासाठी या किल्ल्यांचा वारसा तसंच ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यांचा वारसा स्थळात समावेश होईल, अशी मला खात्री आहे. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
युनेस्कोच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा समावेश करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. केंद्र सरकारनं यासंदर्भात प्रस्ताव सादर केला असून तो युनेस्कोकडं सादर करण्यात आला आहे. त्यात रायगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, खंडेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या 12 किल्ल्यांचा समावेश आहे.- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
महाराजांचा इतिहास जगभर पोहोचेल :गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडाचा समावेश युनेस्कोच्या यादीत व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आता त्यात यश आलं, असून देशभरातील 12 राज्यांमधून महाराष्ट्रातील किल्ल्यांना केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं मान्यता दिली आहे. त्या किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोकडं पाठवला आहे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळं आम्ही पाठवलेला किल्ल्यांचा प्रस्ताव जवळपास निश्चितच मंजूर होईल, असा आशावाद सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. यानिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगभर पोहोचेल. जगभरातील लोक महाराजांना एक आदर्श राजा म्हणून ओळखतील. त्यामुळं जगभरातील लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं भक्त होतील, असंही मंत्री मुनगंटीवार म्हणाले.
किल्ले महाराष्ट्राच्या समृद्धीचं प्रतीक :हिंदवी स्वराज्य स्थापन करून रयतेच्या हिताचं कार्य करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्कम किल्ले बांधून बलाढ्य राज्य निर्माण केलं. 'हे' किल्ले स्वराज्याच्या वैभवाचं तसंच महाराष्ट्राच्या समृद्धीचं प्रतीक आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'X' या सोशल साईटवर म्हटलंय. अनेक शतकांपासून उंच उभ्या असलेल्या या किल्ल्यांवर ऐतिहासिक वारशाचा शिक्का मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यात महाराष्ट्रातील 11 तसंच तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याला 2024-25 च्या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत नामांकन मिळालं आहे. महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग यांना जागतिक मान्यता मिळणार आहे.
महाराजांच्या कार्यपद्धतीचा जगाला फायदा : छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले युनेस्कोच्या यादीत पाठवण्यासाठी त्यांचे नामांकन करण्यात आलं आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ योद्धे नव्हते, तर त्यांच्याकडे विविध क्षेत्रातील ज्ञान होते. त्याचा जनकल्याण कसा होईल यात महाराजांना रस होता. छत्रपती शिवाजी महाराज हे परोपकारी होते. त्यामुळे त्यांच्या किल्ल्यांचा वारसा आणि इतिहास जगासमोर येईल. महाराजांचा गौरवशाली इतिहास सर्वांना कळेल, असे मत इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी व्यक्त केले. तसेच जगभरातील राजकीय नेत्यांनी महाराजांचा आदर्श घ्यावा. महाराजांच्या विचारांचा उपयोग विश्व निर्माण करण्यासाठी झाला पाहिजे, असेही सोनवणी यांनी म्हटलं आहे. जो भारताच्या मध्ययुगीन काळात एकमेव राजा बनला. त्यांनी जनहितासाठी आणि रयतेच्या हितासाठी खूप काम केल्याचे दिसून येते. आजच्या राजकारणाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन किल्ल्यांमध्ये नाविन्य आणले पाहिजे. इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनीही ज्ञानसंस्था, शैक्षणिक संस्था असल्याने त्यामध्ये अधिक सखोलता कशी येईल हे पाहिले पाहिजे. तसेच, हे आधी होणे अपेक्षित होते, परंतु ते उशिरा झाले पाहिजे. कोणतेही राजकारण न करता किंवा राजकीय श्रेय न घेता महाराजांचा इतिहास जगासमोर आणला जात आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे मत इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी व्यक्त केले.
हेही वाचा -
- लोकसभा निवडणुकीकरिता आध्यात्मिक नगरी नाशिकमधून तीन धर्मगुरू इच्छुक, कोणत्या पक्षांकडून मिळणार उमेदवारी?
- महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी, मतांच्या बेरजेत गडबड झाल्याचा 'आप'चा आरोप
- नितीशकुमार भाजपासोबत जाताच राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा' बिहारमध्ये, पूर्णियामध्ये घेणार जाहीर सभा