पुणे (पिंपरी चिंचवड )Blind youth broke commissioner car: स्वातंत्र्यदिनी चक्क पिंपरी महापालिका आयुक्तांचीच गाडी फोडण्यात आली आहे. महापालिकेत ध्वजारोहण सुरू असताना एका अंध तरुणानं आयुक्त शेखर सिंह यांच्या वाहनाची फोडफोड केली. अटक करणाऱ्या पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोपही या अंध तरुणानं केला आहे. महापालिका आयुक्त वारंवार आपलं काम करण्याचे टाळाटाळ करत असल्याचा अंध तरुणानं आरोप केला.
घटनेचा तपास सुरू :15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी पिंपरी चिंचवडमध्ये कार्यक्रम सुरू असतानाच अंध व्यक्तीनं महापालिका आयुक्त शेखर सिंग यांच्या गाडीची तोडफोड केलीय. सदर व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याला आणखी एक जण मदत करत असल्याची माहिती समोर. पिंपरी पोलिसांनी अंध तरुणाचा राग शांत करून घटनेचा तपास सुरू केलाय. विनायक सोपान ओव्हाळ (रा. काळेवाडी पिंपरी) असं या या तरुणाचं नाव आहे. "अनेक महिन्यांपासून महापालिका आयुक्तांना भेटण्यासाठी वेळ मागत आहे. पण, आयुक्त आम्हाला भेटत नाही. आम्ही त्यांची दिवसभर वाट पाहतो, असं तरुणाचं म्हणणं आहे." याचाच राग मनात धरून या तरुणानं गाडीची तोडफोड केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.