महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोठी बातमी! एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा - encounter specialist pradeep sharma

Income Tax Raid : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागानं छापा टाकलाय. मिळालेल्या माहितीनुसार माजी खासदार आणि आमदाराच्या करचुकवेगिरी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

income tax department raid on encounter specialist pradeep sharma house
एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2024, 5:24 PM IST

Updated : Feb 8, 2024, 7:57 PM IST

मुंबई Income Tax Raid :मुंबई पोलीस दलातील एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घरी आयकर विभागानं छापेमारीची कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार कर चुकवेगिरी प्रकरणी प्रदीप शर्मा यांच्या घरावर ही कारवाई करण्यात आली आहे.

प्रदीप शर्मांच्या घराची झाडाझडती :मनसुख हिरेन हत्याकांडातील आरोपी प्रदीप शर्मा हे सध्या जामिनावर बाहेर आहेत. मुंबईतील पश्चिम उपनगरातील अंधेरी परिसरात असलेल्या 'एव्हरेस्ट हाईट' या इमारतीतील एकोणिसाव्या मजल्यावर प्रदीप शर्मा यांचं घर असून या ठिकाणी आज (8 फेब्रुवारी) दुपारी आयकर विभागाचे दहा ते बारा अधिकारी कारवाईसाठी पोहोचले. माजी खासदार आणि आमदाराच्या कर चुकवेगिरी संबंधी एका प्रकरणात प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाकडून झाडाझडती घेतली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर प्राथमिक माहितीनुसार आयकर विभागाकडून मुंबईतील तीन ठिकाणी छापीमारीची कारवाई सुरू आहे.

नेमकं कोण आहेत प्रदीप शर्मा? :प्रदीप शर्मा हे माजी पोलीस अधिकारी असून 1983 मध्ये ते पोलीस दलात दाखल झाले होते. मुंबई पोलीस दलात असताना प्रदीप शर्मा यांनी संघटित गुन्हेगारी विरुद्ध आघाडी उघडली होती. मुंबई पोलिसांनी केलेल्या अनेक एन्काऊंटरमध्ये प्रदीप शर्मा यांचा सहभाग होता. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कारवायांमध्ये जवळपास 112 गुंड मारलं गेल्याचं बोललं जातं. त्यामुळंच त्यावेळी प्रदीप शर्मा हे एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जायचे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून त्यांना नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. परंतू, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. दोन वर्षांपूर्वी त्यांना अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटक झाली होती. दोन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला आहे.

हेही वाचा -

  1. Antilia bomb case: सर्वोच्च न्यायालयाकडून माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला जामीन मंजूर
  2. MP Accident Death : लग्नाला जाणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला, मध्य प्रदेशात मिनी ट्रक नदीत उलटून 12 नागरिकांचा मृत्यू
  3. Antilia Bomb Scare Case : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दणका ; रुग्णालयातून तातडीने कारागृहात पाठवण्याचे निर्देश
Last Updated : Feb 8, 2024, 7:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details