महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठवाड्यात पावसाची संततधार, जायकवाडी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार - rain in Marathwada

Rain in Marathwada - मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे. असाच पाऊस राहिला तर कोणत्याही क्षणी जायकवाडी धरण पूर्ण भरू शकते. त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. प्रशासन त्यासाठी सज्ज आहे. त्याचवेळी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2024, 12:51 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Rain in Marathwada: जिल्ह्यात रविवारी रात्री पासून पावसाची संतत धार पाहायला मिळत आहे. यावर्षीचा सतत पडणारा हा पहिलाच पाऊस आहे. जिल्ह्यात प्रशासनाने 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. ४८ तासांत जोरदार वृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारी संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तर जायकवाडी धरण पूर्ण भरणार आहे. सध्य स्थितीत ८७% पाणीसाठा असून पुढील काही दिवसात धरणाचे दरवाजे उघडण्यात येतील. त्यामुळे मराठवाड्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.



मराठवाड्यात पावसाची हजेरी : रविवार दुपारनंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तर सोमवारी मराठवाड्यावर मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव आणि नांदेडमध्ये जोरदार वृष्टीची शक्यता आहे. जायकवाडी धरणात ३२ क्युसेक वेगाने पाणी दाखल होत आहे. सध्या स्थितीत ८७% टक्के इतके धरण भरलं आहे. तर बाजूच्या कालव्यातून ७०० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सरकारी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. एनडीआरएफ पथकाला सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसंच पाण्याची आवक तपासून धरणाचे दरवाजे उघडण्यात येतील अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.



देवगिरी एक्स्प्रेस रद्द :संभाजीनगर रेल्वेस्टेशनवरून रात्री ११.२० वाजता देवगिरी एक्स्प्रेस मुंबईकडे रवाना होते. ही एक्स्प्रेस पावसामुळे रविवारी रद्द केली. परिणामी आता मुंबईहून सिकंदराबादला जाणारी देवगिरी एक्स्प्रेसदेखील सोमवारी धावणार नाही, असं रेल्वे प्रशासनाने सांगितलं. काही गाड्या उशिराने तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होऊ शकतो असं रेल्वे विभागातर्फे सांगण्यात आलं. त्याचबरोबर मराठवाड्यात जोरदार पाऊस सुरू आहे. बसमधून प्रवास करण्यास सध्या अडचण नसून, सोमवारी पावसाचं वातावरण पाहून बस रद्द करण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details