महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लाडकी बहीण योजनेत भावांचे फोटो लावून पैसे लाटण्याचा प्रयत्न, लवकरच होणार कारवाई - Ladaki Bahin Yojana - LADAKI BAHIN YOJANA

Ladaki Bahin Yojana - राज्यात सध्या 'लाडकी बहीण योजना'चा बोलबाला आहे. सरकार ही योजना जोरदारपणे राबवण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे लाडक्या भावांनीच सरकारला बहिणीच्या नावानं गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आता यावर कारवाई करण्यात येणार आहे. वाचा नेमकं काय आणि कुठे घडलंय.

लाडकी बहीण योजनेत भावांचे फोटो लावून पैसे लाटण्याचा प्रयत्न
लाडकी बहीण योजनेत भावांचे फोटो लावून पैसे लाटण्याचा प्रयत्न (ईटीव्ही भारत बातमीदार)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2024, 5:07 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Ladaki Bahin Yojana -लाडकी बहीण योजनेत चक्क भावांनीच अर्ज केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातल्या १२ भावांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज केलाय. तर जिल्ह्यात आणखी काही पुरुषांनी या योजनेत आपली नोंदणी केली असून पडताळणीमधे ही गोष्ट लक्षात आल्यानं हे अर्ज बाद करण्यात आले आहेत. हा प्रकार महिला व बालकल्याण विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर, कारवाई करण्याचा अहवाल सादर करण्यात आलाय. त्यामुळे या योजनेतील सुरू असलेला गोंधळ पुन्हा एकदा समोर आलाय.


अर्ज भावाचा आणि फोटो बहिणीचा -मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांना देण्यासाठी राज्य शासनाने या योजनेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत ९२ हजार ९८ अर्ज भरण्यात आले आहेत. त्या अर्जाची ३० ऑगस्ट रोजी पडताळणी केल्यानंतर भलताच प्रकार समोर आला आहे. त्यात १२ भावांनी स्वतःच्या नावाने संबंधित पोर्टलवर अर्ज दाखल केले. आधार कार्डही स्वतःच्याच नावाचं अपलोड केलं, तसंच हमीपत्रही स्वतःच्याच नावाने भरून दिलं. मात्र पोर्टलवर फोटो त्यांच्याऐवजी अन्य महिलांचे अपलोड केले. याबाबत पडताळणी करताना हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे या बोगसगिरीबाबत तातडीने अहवाल सादर करण्यात आल्याची माहिती महिला बालकल्याण अधिकारी रेश्मा चिमंद्रे यांनी दिली.

लाडकी बहीण योजनेत भावांचे फोटो लावून पैसे लाटण्याचा प्रयत्न (ईटीव्ही भारत बातमीदार)

पुरुषांनी देखील केले अर्ज -माझी लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद राज्यात मिळाला आहे. अनेक महिला आजही अर्ज करण्यासाठी रांगेत उभ्या असल्याचं पाहायला मिळतं. अनेक महिलांना पहिला हप्ता जमा झाल्यानंतर योजनेचा विश्वास मिळाला आणि त्यानंतर त्यांनी अर्ज करायला सुरुवात केली. त्यातच महिलांची अर्ज पडताळणी करत असताना पुरुषांनी देखील या योजनेत अर्ज केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कन्नड तालुक्यात झालेल्या प्रकारानंतर याची अधिक सूक्ष्म पडताळणी करायला सुरुवात करण्यात आली आहे. त्यात पुरुषांनीच स्वतःचीच कागदपत्रं आणि फोटो अपलोड करत योजनेत अर्ज केल्याचं समोर आलं आहे. या सर्वांचा अहवाल आता वरिष्ठ पातळीवर सरकारकडे सादर करण्यात आला असून नेमकी कोणती कारवाई होईल ते योग्य सूचना आल्यावरच कळेल असं महिला बालकल्याण अधिकारी रेश्मा चिमंद्रे यांनी सांगितलं.


गुन्हे दखल करणार - योजना सुरू करताना सरकारचा प्रामाणिक हेतू आहे. महिलांना फायदा मिळावा याकरता ही योजना सुरू करण्यात आली. मात्र या योजनेचा विरोधकांनी अपप्रचार देखील केला. काही ठिकाणी मुद्दाम त्रुटी असलेले अर्ज करून त्याबाबत फायदा मिळणार नाही असं सांगण्यात येत होतं. मात्र ही योजना सुरू राहणार असून महिलांना त्याचा फायदा मिळणार आहे. कन्नड तालुक्यात उघड झालेल्या या प्रकाराची गंभीर दखल सरकार घेईल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची देखील प्रक्रिया करण्यात येईल असं मत शिंदे गट शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं.


हेही वाचा...

  1. लाडक्या बहिणीला सावरण्यासाठी मुख्यमंत्री 'लाडक्या बहिणीं'च्या दारी; 'या' योजनांचा करणार प्रचार - Ladki Bahin Kutumb Bhet Campaign
  2. लाडकी बहीण योजना : 50 हजाराहून अधिक लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यात मिळाला लाभ, आता महापालिकेनं केलं 'हे' आवाहन - Ladki Bahin Yojana
  3. महायुतीत लाडक्या बहिणीवरुन श्रेयवादाची लढाई? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकं काय घडलं? - Ladki Bahin Yojana

ABOUT THE AUTHOR

...view details