महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बिहारमध्ये एनडीए 40 जागा तर लोक जनशक्ती पार्टी 5 जागा जिंकेल - चिराग पासवान - Chirag Paswan On Lok Sabha Election - CHIRAG PASWAN ON LOK SABHA ELECTION

Chirag Paswan On Lok Sabha Election : बिहारमधील लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी आज (21 मार्च) रोजी साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी बिहारमध्ये एनडीए लोकसभेच्या 40 जागा तर लोक जनशक्ती पार्टी 5 जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान मोदींचं चारशे पारचं स्वप्न पूर्ण होईल, असंही ते म्हणाले.

Chirag Paswan On Lok Sabha Election
चिराग पासवान

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 21, 2024, 5:15 PM IST

चिराग पासवान लोकसभा निवडणुकीविषयी बोलताना

शिर्डी (अहमदनगर)Chirag Paswan On Lok Sabha Election :चिराग पासवान यांनी आज शिर्डी साईबाबांच्या दरबारी हजेरी लावली.लोकसभा निवडणूक लागण्याआधी सहपरिवार शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येण्याची इच्छा होती, असं ते म्हणाले. सहपरिवार शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आलो आणि साईबाबांच्या दर्शनांबरोबर माध्यान्ह आरतीलाही हजेरी लावलीय. येत्या काळात पुन्हा देशात 'एनडीए'चे सरकार यावे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 400 पारचे स्वप्न पूर्ण व्हावे, अशी प्रार्थना यावेळी लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष असलेल्या चिराग पासवान यांनी साईबाबांच्या चरणी केलीय.

बिहारमध्ये 40 जागा जिंकू :बिहार राज्यातील गावा-गावात मी गेल्या अडीच वर्षांपासून फिरत आहे. मला विश्वास आहे की, बिहार राज्यातील चाळीसच्या चाळीस जागा 'एनडीए' जिंकेल. आमची पार्टी पाचही जागा जिंकून पंतप्रधान मोदींचे चारशे पारचे स्वप्न पूर्ण करणार, असा विश्वास एनडीएमध्ये सहभागी झालेल्या लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी साई दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

तेजस्वी यादवांवर टीका : ज्यावेळी नितिश कुमार तेजस्वी यादव यांच्याबरोबर होते तेव्हा ते चांगले होते. सत्तेत येण्यासाठी राष्ट्रीय जनता दल आणि विरोधक प्रयत्न करतायेत. त्यामुळे काहीही करून त्यांनी युती करण्याचा प्रयत्न केला आहे. बिहारची जनता चाळीस जागा निवडून देणार आहे. सच्चाईची नेहमी जीत होत असते. माझ्या आप्त स्वकीयांनी माझ्या विरोधात, पार्टी विरोधात कारस्थान रचले होते. माझे लोक माझ्या बरोबर असते तर माझा परिवार तुटला नसता. मात्र, व्यक्ती नाहीतर वेळ बलवान असते, असे विचार चिराग पासवान यांनी मांडले.

घरातील मोठे माझे चुलतेच :काका-पुतण्याची लढाई महाराष्ट्रा बरोबरीने बिहारमध्ये पण दिसून येतेय. मात्र जेथे सत्य आहे त्याच्याबरोबर जनता आहे. त्यांना कोणीही झुकवू शकत नाही. क्षणिक वेळ त्रास होतो. पण तो नंतर नाहीसा होतो. माझे वडील गेल्यानंतर घरातील मोठे माझे चुलतेच आहेत. वडील गेल्यानंतर परिवारापासून वेगळा होण्याचा मला पार्टीतून काढण्याचा निर्णय त्यांनीच घेतला होता. आज ते माझ्या बरोबर येतात की नाही, हा निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे, असं रोखठोक मत चिराग पासवान यांना मांडलं.

हेही वाचा :

  1. 'मनसे' महायुतीत? मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस-राज ठाकरे यांच्यातील बैठक संपली! - MNS May Join NDA
  2. Arunachal Pradesh As Indian Territory : चीनचा दावा अमेरिकेनं फेटाळला; अरुणाचल प्रदेश हा भारताचाच भूभाग असल्याचं केलं स्पष्ट
  3. Lok Sabha Elections 2024: ...म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंचा सन्मान करतो, आम्हालाही उत्तर देता येतं; प्रतापराव जाधवांचा थेट इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details