नागपूर: नागपुरातून बेकायदेशीर डंकी मार्गाने अमेरिकेत गेलेल्या तरुणाची माहिती आता समोर आली आहे. हरप्रीत सिंह ललिया असं तरुणाच नाव आहे. ३४ वर्षीय हरप्रीत सिंह ललियाचा नागपुर शहरात ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. ५ डिसेंबर २४ रोजी हरप्रीत सिंह अबुधाबी मार्गे कॅनडाला जाण्यासाठी दिल्लीतून निघाला होता. हरप्रीत सिंह ललिया याने डंकी मार्गाने कॅनडाला जाण्यासाठी एजंटला दोन टप्प्यांमध्ये सुमारे 50 लाख रुपये दिले होते. पहिल्यांदा अठरा लाख रुपये भारतात देण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात सुमारे 31 लाख 50 हजार रुपये घेण्यात आले.
हरप्रीत सिंह ललियाला चौकशीसाठी बोलावले : आज पहाटे नागपूर आल्यानंतर हरप्रीत सिंह ललियाला नागपूर पोलिसांनी पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलावले होते. बुधवारी अमृतसरमध्ये आणि त्यानंतर मुंबईमध्ये ही सेंट्रल एजेंसीसने चौकशी केली होती. एजंटच्या माध्यमातून कॅनडाचा विजा काढलेला होता. मात्र, अबुधाबी विमानतळावर हरप्रीतसिंह ललिया थांबवण्यात आले होते. कॅनडाच्या विमानात बसू देण्यात आले नाही. त्यानंतर हरप्रीत सिंहला विमान कंपनीने पुन्हा दिल्लीला पाठवले.
असा सुरु झाला अवैध प्रवास : १८ डिसेंबर पर्यंत दिल्लीला थांबल्यानंतर एजेंट ने मुंबईमार्गे आधी इजिप्त त्यानंतर कॅनडाला जाण्याचा नवा मार्ग सुचवला आणि व्यवस्था ही केली. १८ डिसेंबरला हरप्रीत सिंह दिल्लीवरून मुंबईला येऊन इजिप्तला विमानाने पाठवण्यात आले. २२ डिसेंबरपर्यंत इजिप्तला थांबून तिथून हरप्रीत सिंह ललियाला स्पेनची राजधानी मद्रिडला विमानाने पाठवण्यात आले. मेड्रीड स्पेन वरून त्यांचं साहित्य कॅनडाला पाठवलं गेलं, मात्र हरप्रीतसिंह ललियाला विमानाने दक्षिण अमेरिकेतील ग्वाटेमालाला नेण्यात आलं.