अहमदनगर IAS Pooja Khedkar :ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोयी-सुविधांची मागणी करणाऱ्या परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. पूजा खेडकर यांनी दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र दाखवून यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केल्याचा दावा आता केला जातोय. पूजा खेडकर यांच्याविषयी रोज नव-नवीन खुलासे होत असल्याचंही बघायला मिळतंय. असं असतानाच आता पूजा खेडकर यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राविषयी धक्कादायक माहिती समोर आली.
प्रतिक्रिया देताना जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे (ETV BHARAT Reporter) वैद्यकीय प्रमाणपत्र अहमदनगरच्या शासकीय रुग्णालयाचे : "पूजा खेडकर यांच्यावरून महाराष्ट्रासह देशात चांगलंच वादळ उठलं आहे. पूजा यांना वैद्यकीय प्रमाणपत्र अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयानं दिलं. 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 ला मानसिक आजाराचं प्रमाणात दिलं. डोळे आणि मानसिक आजार यांचे एकत्रित 2020-2021 ला प्रमाणात पत्र दिलं. शासकीय रुग्णालयाचे दस्तावेज तपासले असता त्यात नोंदी आढळून आल्या," अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी दिली.
काय आहे प्रकरण? : पूजा खेडकर यांचे वडील सेवानिवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर हे भालगाव (ता. पाथर्डी) येथील रहिवासी आहेत. परंतु, गेल्या काही वर्षापासून ते पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यांची मुलगी पूजा खेडकर हा दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आयएएस अधिकारी झाल्या, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला होता. प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी म्हणून त्यांची पुण्यात नियुक्ती झाली होती. खासगी वाहनावर लाल दिवा लावणे, भारत सरकार असा बोर्ड लावणे, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात हस्तांतरीत करणे, आदी नियमबाह्य वर्तन त्यांनी केलं होतं, असा आरोपही होता. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.
हेही वाचा -
- पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा ; चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला सोडवण्यासाठी पोलीस उपायुक्तांवर टाकला दबाव - Pooja Khedkar Tried To Pressure DCP
- दिव्यांग असल्याचं सांगून पूजा खेडकर झाल्या IAS? खेडकर आहेत 17 कोटींची संपत्तीच्या मालकीण - IAS Officer Pooja Khedkar
- पूजा खेडकर यांच्या आईनं घातला पोलिसांसोबत वाद; 'ऑडी'वर तब्बल 'इतका' फाईन, पाठवली नोटीस - Controversial IAS Pooja Khedkar