मुंबई : दक्षिण मुंबईत आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीनं आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी तरुणी ही मंत्रालयासमोर असलेल्या सुरुची इमारतीच्या 10 मजल्यावर गेली होती. तिच्या आत्महत्येबाबत पोलीस अधिक तपास करत आहे. आज सकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तरुणीला उपचारासाठी रुग्णाला दाखल केले होते. मात्र, दाखलपूर्व मुलीला मृत घोषित करण्यात आले असल्याची पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी दिली आहे. लिपी रस्तोगी ही 26 वर्षीय तरुणी कायद्याचे शिक्षण घेत असताना ती तणावाखाली असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिपी हिने लिहिलेली सुसाईड नोटदेखील पोलिसांना सापडली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीमुळे ती चिंतेत होती. कफ परेड पोलीस स्टेशनमध्ये अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आज दुपारी अंत्ययात्रा निघणार-आयएएस अधिकारी विकास रस्तोगी हे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे काम करतात. अतिशय हुशार अधिकारी म्हणून विकास रस्तोगी यांची ओळख आहे. मात्र, त्यांची मुलगी लिपी रस्तोगी येण्या आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली, याचे कारण समजू शकलेले नाही. गोकुळदास तेजपाल म्हणजेच जीटी हॉस्पिटलमध्ये लिपी रस्तोगी हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. आज दुपारी एक वाजल्यानंतर अंत्ययात्रा निघणार आहे. विकास रस्तोगी यांच्या बहिणी हैदराबादला राहतात. त्यादेखील मुंबईला येण्यास निघाल्या आहेत.
आत्महत्या हा उपाय नाही- जर तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील अथवा एखाद्या मित्राबद्दल काळजी वाटत असेल किंवा तुम्हाला भावनिक आधाराची गरज असेल, तर कोणीतरी नेहमी ऐकण्यासाठी उपलब्ध असते. तुम्ही स्नेहा फाउंडेशन - 04424640050 (24x7 उपलब्ध) किंवा iCall, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेची हेल्पलाइन - 9152987821 वर कॉल करा. ही हेल्पलाईन सोमवार ते शनिवार सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत उपलब्ध आहे.
हेही वाचा-
- खळबळजनक! शिक्षकाचं विद्यार्थिनीवर प्रेम जडलं, तिने थेट आयुष्यच संपवलं - Girl Student Suicide Case
- कुटुंबातील ८ जणांची हत्या करून कुटुंबप्रमुखाची आत्महत्या, नेमकं कारण काय? - chhindwara mass murder