ठाणे Husband Cant Sex With Wife : एका 32 वर्षीय महिलेनं आपला नवरा शारीरिक सुख देत नसल्याच्या कारणामुळे पोलिसांत तक्रार दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कल्याण पश्चिममधील हायप्रोफाईल वस्ती असलेल्या शहाड परिसरात ही घटना घडली.
नपुंसक असल्याची तक्रार दाखल : या प्रकरणी महिलेनं खडकपाडा पोलीस ठाण्यात 40 वर्षीय नवऱ्याविरुद्ध नपुंसक असल्याची तक्रार दाखल केली. नवऱ्यानं लग्नापूर्वी आपण बायकोला शारीरिक सुख देऊ शकत नाही ही माहिती दिली नाही. त्यानं लग्न करून मला शरीर सुखापासून वंचित ठेवलं, असं महिलेनं तक्रारीत नमूद केलंय.
फसवून लग्न केलं : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही 32 वर्षीय महिला ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एका दुर्गम गावात राहते. गेल्या जून मध्ये तिचं लग्न शहाडमधील एका 40 वर्षीय तरुणाशी झालं. लग्नापूर्वी महिलेच्या नातेवाईकांनी, तुम्ही विवाहासाठी इतका उशीर का केला, असा प्रश्न विचारला असता, त्यानं आपण सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात होतो, म्हणून विवाहास विलंब झाला, असं कारण दिलं.
नवरा नपुंसक असल्याचं उघड : महिलेनं नवरा शिकलेला आहे म्हणून त्याला पसंत केलं. या दोघांचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. मात्र लग्नानंतर नवरा विक्षिप्तपणे वागत असल्याचं महिलेच्या निदर्शनास आलं. नवऱ्यामध्ये काहीतरी दोष आहेत हे या महिलेलं समजलं. यामुळे ती अस्वस्थ झाली आणि आपल्या माहेरी निघून गेली. यानंतर, सासरच्या मंडळींच्या आग्रहामुळे ती माहेरून परतली. यावेळी तिला नवऱ्यामधील दोष प्रकर्षानं दिसून आले. तो डॉक्टरांकडून काहीतरी औषधं घेत असल्याचंही तिला आढळलं. तिने यासंबंधी डॉक्टरांकडे विचारणा केली असता, डॉक्टरांनी नवऱ्यामध्ये काही भावनिक दोष असल्याचं सांगितलं.
विश्वासघात आणि फसवणूक केल्याची तक्रार : आपला नवरा नपुंसक असून त्याच्याकडून आपल्याला कधीही शारिरीक सुख मिळणार नाही, हे समजल्यानंतर महिलेनं विश्वासघात आणि फसवणूक केल्याची तक्रार खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल केली. आता या प्रकरणी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एन. घस्ते पुढील तपास करत आहेत.
हे वाचलंत का :
- 'मम्मी-पप्पा, मी जेईई करू शकत नाही, मला माफ करा'; परीक्षेच्या आधी कोटामध्ये 18 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या