अमरावती Amravati Central Jail :अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कारागृहाच्या मागच्या बाजूनं जाणाऱ्या अमरावती-नागपूर द्रुतगती महामार्गावरून दोन बॉम्ब सदृश्य वस्तू फेकण्यात आल्या. यापैकी एक बॉम्बसदृश्य वस्तूही वर हवेतच फुटली. तर दुसरी बॉम्बसदृश्य वस्तू कारागृहाच्या आवारात पडली. सुदैवानं दुसरी बॉम्बसदृश्य वस्तू फुटली नाही. मात्र या संपूर्ण घटनेनं कारागृह प्रशासन हादरल.
अमरावती मध्यवर्ती कारागृहात फेकल्या बॉम्ब सदृश्य वस्तू (Source - ETV Bharat) कारागृहात प्रचंड खळबळ :शनिवारी रात्री अमरावती मध्यवर्ती कारागृहात बॉम्ब सदृश्य वस्तू हवेत फुटल्यामुळं मोठा आवाज झाला. यामुळं कारागृहात तैनात अधिकारी आणि कर्मचारी आवाजाच्या दिशेनं धावून आले. त्यावेळी एक जिवंत बॉम्ब सदृश्य वस्तू बराक क्रमांक सहा आणि सातमध्ये पडलेली आढळून आली. यानंतर कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पथक तसेच बॉम्बशोधक पथक कारागृहात पोहोचले. बॉम्बशोधक आणि नाशक पथकानं कारागृहातील बराक क्रमांक सहा आणि सातच्यामध्ये पडलेली बॉम्ब सदृश्य वस्तू निष्क्रिय करून जप्त केल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
पोलीस म्हणतात फटाका फेकला :अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दोन बॉम्ब फेकल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांच्या वतीनं ही बॉम्बसदृश्य वस्तू बॉलच्या स्वरूपात असल्याची माहिती देण्यात आली आहे. कारागृहात कोणीतरी वरून बॉलच्या स्वरूपात फटाका फेकला. यापैकी एक फटाका वरच फुटला. तर बॉल हा कारागृहाच्या परिसरात आढळून आला. बॉम्बशोधक पथकानं हा बॉल जप्त केला असून फॉरेन्सिक युनिटची टीम या प्रकरणाचा तपास करेल, अशी माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली. कारागृहात बारूद भरलेले बॉल नेमके कोणी फेकले? याचा तपास केला जात आहे, अशी माहिती देखील पोलीस आयुक्तांनी दिली.
1992 मध्ये कारागृहाच्या मागे दहशतवाद्यांवर गोळीबार :अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात 1992 मध्ये पंजाबमधील दहशवादी कैद होते. त्यावेळी कारागृहाच्या मागच्या बाजूला असणाऱ्या रामकृष्ण कॉलनीमध्ये एका घरात पंजाबमधील एक कुटुंब भाड्यानं राहत होतं. या कुटुंबाचा थेट पंजाबमधील दहशतवाद्यांशी संबंध होता. विशेष म्हणजे या कुटुंबाकडे पंजाबमधून पाच ते सहा दहशतवादी आले असताना त्यांच्या मागावर पंजाब पोलीस अमरावतीत पोहोचले. त्या घरातील दहशतवादी पकडण्यासाठी पंजाब पोलिसांनी सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत गोळीबार केला होता. त्या घटनेत एक पोलीस कर्मचाऱ्यासह दोन लहान मुलं ,दोन महिला आणि पाच पुरुष ठार झाले होते. कारागृहात बंद असणाऱ्या आपल्या साथीदारांना सोडविण्यासाठी हे दहशतवादी अमरावती आल्याचं त्यावेळी उघड झालं होतं.
कारागृहाची भिंत पाच फुटांनी वाढवली, महामार्गामुळे सुरक्षेत त्रुटी :1992 मध्ये कारागृहातील अतिरेक्यांना सोडवून नेण्यासाठी त्यांचे पंजाबमधील साथीदार अमरावतीपर्यंत पोहोचल्यामुळं खळबळ उडाली होती. यानंतर कारागृह प्रशासनानं कारागृहाची भिंत आणखी पाच फुटांनी वाढविली. यासह कारागृहाच्या मागच्या बाजूला दोन्ही दिशेनं चेक पोस्ट उभारून त्या ठिकाणी कायमस्वरूपी जवान तैनात करण्यात आले. अमरावती ते नागपूर हा द्रुतगती महामार्ग 2003 पासून सुरू झाला. हा महामार्ग कारागृहाच्या मागच्या बाजूनं उंचावरून जातो. विशेष म्हणजे या द्रुतगती महामार्गावर कारागृहाच्या आतमधीला परिसर सहज दिसतो. या महामार्गावरून कारागृहात कोणतीही वस्तू सहज फेकता येते.
हेही वाचा
- 17 कोटी 94 लाख 75 हजारांचा गंडा : आरोपीला पोलिसांनी तिरुपतीत बेड्या ठोकल्या, एक वर्षापासून होता फरार - Fraud of investors in Mumbai
- बायकोचा नवऱ्यानं काढला काटा : पुरावा नष्ट करण्यासाठी रचला बनाव; आरोपीला पोलीस कोठडी - husband killed his wife
- अर्धनग्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह; अत्याचाराचा संशय - Woman Body Found Palghar