मुंबई Anant Radhika Wedding :मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी तसंच वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. या लग्नाशी संबंधित सर्वच बातम्या चर्चेत आहेत. अशा परिस्थितीत विवाह करणाऱ्या पंडितांबाबत देखील चर्चा होत आहे. पंडित चंद्रशेखर शर्मा यांच्या उपस्थितीत अनंत अंबानी तसंच राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीचे सर्व विधी पार पडले. एका रिपोर्ट्सनुसार, गुजरातमधील जामनगरमध्ये झालेल्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये पंडित चंद्रशेखर शर्माही उपस्थित होते. अनंत अंबानी यांचा विवाह लावणारे पंडित चंद्रशेखर शर्मा कोण आहेत? ते किती फी घेतात, चला जाणून घेऊ या....
कोण आहेत पंडित शर्मा? : पंडित चंद्रशेखर शर्मा यांनी त्यांच्या फेसबुक हँडलवर अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्याची झलक शेअर केली. अंबानी कुटुंबानं 'अँटिलिया'मध्ये गणेश चतुर्थी उत्सव आयोजित केला होता, तेव्हा देखील शर्मा यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक फोटो शेअर केला होता. काही वर्षांपूर्वी त्यांनी अंबानी कुटुंबासोबतचा फोटोही पोस्ट केला होता. त्यात नीता अंबानी, राधिका मर्चंट, आकाश अंबानी, अनंत अंबानी आदी दिसले होते.
लाइफस्टाइल मोटीवेटर : पंडित चंद्रशेखर शर्मा हे फक्त ज्योतिषी तसंच पुजारी नाहीत, तर ते एक वैयक्तिक प्रशिक्षक, लाइफस्टाइल मोटीवेटर देखील आहेत. त्यांच्या अधिकृत वेबसाइट pujahoma.com नुसार, शर्मा हे एक आध्यात्मिक मार्गदर्शक आहेत. ग्राहकांना हे अध्यात्माचा मार्ग दाखवतात. त्यांच्या कामातून आध्यात्मिकतेबाबत जागरुकता आणण्यावर ते लक्ष केंद्रित करतात. आध्यात्मिक क्षमता कशी वाढवू शकतात, याचं देखील पंडित शर्मा हे ज्ञान देतात. ज्योतिषशास्त्र, पूजा समारंभाच्या सेवांव्यतिरिक्त, ते आनंदी, निरोगी, समृद्ध जीवनासाठी आध्यात्मिक मार्गदर्शन देखील करतात.
ग्राहकांमध्ये प्रियांका चोप्रा, सोनू निगम यांचा समावेश : शर्मा चार दशकांहून अधिक काळ ज्योतिषशास्त्रांशी संबंधित आहेत. त्यांनी देशभरातील अनेक ग्राहकांना सेवा दिली आहे. त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर काही ग्राहकांची नावं नमूद केली आहेत. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, टॅली, बीकेटी, प्रियांका चोप्रा- जोनास, सोनू निगम, वुडक्राफ्ट, हिम्मतसिंघका इत्यादींचा समावेश आहे. अधिकृत साइटवर पंडित शर्मा यांनी फीसह प्रदान केलेल्या सर्व सेवा देखील नमूद केल्या आहेत. पंडित चंद्रशेखर शर्मा यांच्या अधिकृत वेबसाइट pujahome.com नुसार, ते लग्न लावण्यासाठी 25 हजार रुपये घेतात.
हे वाचलंत का :
- अनंत अंबानीच्या लग्नात नाचून प्रियांका चोप्रा खूश, म्हणाली, "सासरी हे सर्व मिस करते" - Priyanka Chopra
- अनंत-राधिकाच्या लग्नात अमिताभ आणि जया बच्चनच्या पाया पडला शाहरुख खान - Anant Radhika Wedding
- नेत्रदीपक शाही सोहळ्यात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबद्ध - ANANT AMBANI RADHIKA WEDDING