पिंपरी चिंचवड Pune Hoarding Collapse: मुंबईतील घाटकोपर येथे लोखंडी होर्डिंग कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला. आता पिंपरी चिंचवड परिसरातील मोशी भागात लोखंडी होर्डिंग कोसळल्याची घटना (Hoarding Collapse In Moshi) घडलीय. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर 4 दुचाकी आणि टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, या घटनेमुळं मोठी दुर्घटना टळली आहे.
लोखंडी होर्डिंग अचानक कोसळले : याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती अशी की, पिंपरी-चिंचवड शहराती काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता. मोशी येथे रस्त्याच्या कडेला असलेले लोखंडी होर्डिंग अचानक कोसळले. मात्र, हे होर्डिंग 4 दुचाकी आणि एका चारचाकी गाडीवर कोसळले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुख्य रस्त्यावर हे होर्डिंग कोसळले नाही. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आता हे कोसळलेले होर्डिंग अधिकृत की, अनधिकृत याबाबत माहिती समोर आलेली नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यानंतर ही दुर्घटना घडली. त्यामुळं या गाड्यांचं झालेलं नुकसान कोण भरून देणार? हा खरा प्रश्न आहे.