मुंबई Shiv Chhatrapati Sports Awards: राज्यातील ज्या क्रीडापटूंनी राष्ट्रीय खेळाचे आणि सुवर्णपदकाचे निकष पूर्ण केलेले होते, ते निकषात बसत असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. त्यावर शासनाला एका आठवड्याची मुदत ही उत्तर दाखल करण्यासाठी दिली होती. परंतु शासनाने उत्तर दिलं नाही. त्यामुळं आता 'शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारा'ला तीन आठवड्याची स्थगिती देत आहोत, असा निर्णय न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी, न्यायमूर्ती फिरोज फिरदोश पुनिवाला यांच्या खंडपीठानं दिलाय.
पुरस्काराला तीन आठवड्यासाठी स्थगिती: महाराष्ट्रामध्ये 'शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार' शासन दरवर्षी विविध खेळाडूंना देत असते. यामध्ये राज्यातील अनेक क्रीडापटूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार दिला गेला. परंतु ज्या क्रीडापटूंना हा पुरस्कार दिला गेला नाही. त्या विराज लांडगे, विराज परदेशी आणि गणेश नवले यांनी दाखल केलेल्या खटल्यावर शासनाला उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं एका आठवड्याची अंतिम मुदत दिली होती. परंतु शासनाकडून कोणतेही उत्तर दाखल न झाल्यानं उच्च न्यायालयानं यावर ताशेरे ओढले. शासनाचं उत्तर दाखल न करण्याच्या कार्यपद्धतीवर शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराला तीन आठवड्यासाठी स्थगिती दिली आहे.
उच्च न्यायालयात याचिका दाखल : विराज लांडगे, विराज परदेशी आणि गणेश नवले या तीन क्रीडापटूंनी सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार ते निकषात बसत असून देखील दिलेला नव्हता, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयाच्या आधीच्या खंडपीठानं शासनाला आदेश देऊन सुद्धा शासनानं कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळं न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर नव्याने या क्रीडापटूंनी याचिका दाखल केल्या होत्या.