महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राखी सावंतचा अटकपूर्व जामीन नामंजूर, अटकेची टांगती तलवार कायम - pre arrest bail of Rakhi Sawant

pre arrest bail of Rakhi Sawant : राखी सावंतच्या विरोधात मॉडेल शर्मिल चोप्राने एफआयआर केला होता. त्यानंतर पोलिसांना तपासात सहकार्य करण्याच्या ऐवजी राखीने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी राखीचा हा अर्ज नामंजूर केला आहे.

Rakhi Sawant
राखी सावंत

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 7, 2024, 1:41 PM IST

मुंबई - pre arrest bail of Rakhi Sawant : अभिनेत्री-माॅडेल राखी सावंत विरोधात मॉडेल शर्मिल चोप्राने एफआयआर केला होता. तिच्याविरुद्धतिच्या विरोधात झालेल्या तक्रारीनंतर राखीने मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व जामीन मिळण्यासाठी धाव घेतली होती. तिच्या दाखल याचिकेवर उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी राखी सावंत हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. 6 फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.



राखी सावंत हिने बदनामी केली, सार्वत्रिक खोटा प्रचार केला,असे म्हणत शर्मिल चोप्राने मुंबई पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्यात राखीकडून तिच्या बाबत मानहानी केली गेली असे नमूद केले होते. त्या तक्रारी नंतर राखी सावंत हिने त्वरित मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यावर राखीने चौकशीसाठी पोलिसांना सहकार्य केलेच नाही. शिवाय अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयात दाखल केला होता. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी मात्र या खटल्यात आता अटकपूर्व जामीन देता येत नाही, म्हणत राखी सावंतचा अर्ज फेटाळून लावला आहे.



शर्मिल चोप्रा हिने राखी विरुद्ध मुंबईच्या पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवल्यानंतर पोलीस अटक करतील म्हणून राखी सावंत हिने दिंडोशी मुंबई न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा तसेच अटकेपासून संरक्षण मिळावे; असा अर्ज केला होता. मात्र दिंडोशी न्यायालयाने तिला दिलासा दिला नाही.


दरम्यान पोलिसांनी राखी सावंत हिला दाखल एफआयआर अनुषंगाने चौकशी करण्यासाठी राखी सावंत हिला संपर्क देखील केला. परंतु पोलिसांच्या चौकशीसाठी राखी कडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर तिच्या विरोधात अटकेची तयारी पोलिसांनी सुरू केली. त्यानंतर मात्र अटकेच्या भीतीने राखीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.


मागील सुनावणी वेळी एफआयआर दाखल करणाऱ्या शर्मिल हिला नोटीस बजावली होती. मात्र राखीने पोलिसांना तपासात सहकार्य केले नाही. ही बाब मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयात समोर आली. अखेर न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या न्यायालयाने राखी सावंत हिची अटके पासून संरक्षण ही मागणी अमान्य केली आहे. परिणामी राखी सावंतवर आता अटकेची टांगती तलवार कायम आहे. पोलिसांची पुढील भूमिका कोणती असेल, हे आता महत्वाचे ठरणार आहे.



हेही वाचा -

  1. प्रियांका चोप्रानं दाखवली कुशीतील मालतीबरोबरची सुंदर झलक
  2. व्हॅलेंटाईन वीक आणखी रोमँटिक बनवा, ओटीटीवर पाहा हे चित्रपट
  3. संभाजी महाराजांच्या अजेय पराक्रमाची गाथा 'शिवरायांचा छावा'चा ट्रेलर रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details