महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शहापूर तालुक्यात पुराचं थैमान, पुरामध्ये अडकलेल्या दिडशेहून अधिक पर्यटकांना एनडीआरएफच्या पथकानं वाचवलं; शेकडो घरं पाण्याखाली - Heavy Rain in Thane

Heavy Rain in Shahapur Thane : ठाण्यातील शहापूर तालुक्यात मुसळधार पावसानं थैमान घातल्यानं नदी, नाले, ओढ्यांना पूर आला. यामुळं शेकडो घरं पाण्याखाली गेली आहेत. परिणामी नागरिकांचे हाल होत आहेत.

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 7, 2024, 4:19 PM IST

Updated : Jul 7, 2024, 4:42 PM IST

Heavy Rain
शहापूर तालुक्यात पुराचं थैमान (ETV Bharat Reporter)

ठाणे Heavy Rain in Shahapur Thane :ठाण्यातील शहापूर तालुक्यात मुसळधार पावसानं थैमान घातल्यानं नदी, नाले, ओढ्यांना पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात एका फार्म हाऊसवर पावसाळी सहलीसाठी आलेले 151 जण अडकले होते. त्यांना एनडीआरएफच्या पथकानं सुखरुप वाचवलं. मात्र, या पुराचा फटका तालुक्यातील शेकडो घरांना बसला असून नदीकाठची घरं पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत.

शहापूर तालुक्यात पुराचं थैमान (ETV Bharat Reporter)

150 हून अधिक पर्यटकांना काढलं बाहेर : गेल्या चार - पाच दिवसांपासून शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्यानं नदी नाल्यांना पुर आला आहे. विशेषतः तालुक्यातून वाहणाऱ्या भांगरी आणि भातसा नदीला आज पहाटेच्या सुमारास पूर आला. त्यातच शनिवार व रविवार सुट्टीचा बेत आखून मुंबईहून पावसाळी सहलीसाठी शहापूर तालुक्यातील वाशिंद गावाच्या नजीक असलेल्या एका फार्म हाऊसवर जवळपास 150 हून अधिक पर्यटक आले होते. हे पर्यटक पहाटेच्या साखर झोपेत असतानाच नदीला पूर आला आणि पुराच्या पाण्यानं सृष्टी फार्म हाऊसला वेढा घेतला. हे पुराचं दृश्य पाहून एका पर्यटकानं जिल्हा आप्पती व्यस्थापन कक्षात संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. ही माहिती मिळताच ठाण्यावरुन एनडीआरएफ पथकातील 40 जवानांनी घटनस्थळी दाखल होऊन रेस्क्यू ऑपरेशन करत 150 हून अधिक पर्यटकांना बोटीच्या मदतीनं पुराच्या पाण्यातून सुखरुप बाहेर काढलं. यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता.

पुराचं पाणी गावात शिरलं : मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळं भांरगी नदीला पूर आला तर भातसा नदीचे पात्र ओव्हर फ्लो असल्यानं त्या पुराचं पाणी शहापूरमधील गुजराथी बाग व आसनगाव परिसरात शिरलं. त्यामुळं येथील घरं आणि दुकानात पाणी शिरुन शेकडो नागरिकांचे आर्थिक नुकसान होऊन हाल झाले. तर दुसरीकडे भांगरी नदी पात्रात बेकायदा बांधकाम केल्यानं पुराचे पाणी आमच्या घरात शिरल्याचा आरोप करत बाधित नागरिकांनी जोरदार आंदोलन केलं.


हेही वाचा :

  1. मुंबईला पावसाचा तडाखा! ट्रॅकवर झाड कोसळल्यानं मध्य रेल्वेची सेवा साडेपाच तास विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा - Central Railway News
Last Updated : Jul 7, 2024, 4:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details