अमरावती : अमरावती शहर आणि जिल्ह्यातील विविध भागात शनिवारी पहाटे साडेचार वाजल्यापासून विजांच्या गडगडाटांसह जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे ऐन दिवाळीसमोर शेतकऱ्यांची चिंता वाढवली. मुसळधार पावसानं पिकांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. शेतात पडून असलेल्या सोयाबीन पिकाला या मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसला आहे. तर सध्या फुलोऱ्यावर असलेल्या तुरीच्या पिकालाही फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अमरावती परिसरात मुसळधार पाऊस :विदर्भात तुरळक ठिकाणी 18 ते 19 ऑक्टोबर दरम्यान विजांच्या गडगडाटांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली होती. शनिवारी पहाटेपासून मात्र मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आकाशात प्रचंड काळे ढग दाटून आले असून आज दिवसभर कधी मुसळधार तर कधी रिमझिम पावसाची शक्यता श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान शास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक अनिल बंड यांनी वर्तवली. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान :ऐन दिवाळी समोर असताना अमरावतीसह पश्चिम विदर्भातील अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सध्या शेतात असणारं सोयाबीन पीक काही जणांनी घरी आणलं असलं तरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन शेतातच पडून आहे. या मुसळधार पावसामुळे शेतात पडून असणारं सोयाबीन खराब होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावतेय. अनेकांच्या शेतात तुरीला फुलोरा आला असून दिवाळीनंतर येणाऱ्या तुरीवर देखील या पावसामुळे संकट कोसळलं. या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात तुरीला फटका बसण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा :
- परतीच्या पावसाचा तडाखा; जिल्ह्यात 26 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान
- अंधेरीतील मॅनहोलमध्ये बुडून महिलेचा मृत्यू, गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे बीएमसीकडून आवाहन - Maharashtra weather forecast
- राज्यात पावसाचा धुमाकूळ, मुंबईसह पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुट्टी जाहीर; जाणून घ्या कुठं कोणता अलर्ट? - Maharashtra rain