लातूर Gous Shaikh Motivatinal Story :"हाथों की लकीरों पर कभी विश्वास नहीं करना, क्योंकि तकदीर तो उनकी भी होती है जिनके हाथ नही होते". याचाच प्रत्यय लातूरच्या गौस शेखला (Gous Shaikh) बघून येतोय. जन्मतःच दोन्हीही हात नसलेल्या गौसनं बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत 78 टक्के गुण मिळवले आहेत.
दोन्ही हात नसताना पायाने दिली परीक्षा (ETV BHARAT Reporter) बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश : असं म्हणाता की, हातावर लिहिलेल्या रेषा आपलं नशीब ठरवतात, पण, ज्यांना हातचं नाहीत, त्यांचं काय? हात नाहीत म्हणून नशीबाला दोष न देता पायानं बारावीच्या परीक्षेचा पेपर लिहून यश मिळवणाऱ्या गौस शेखनं यशाची नवीन उंची गाठलीय. कर्तृत्व, जिद्द, कठोर परिश्रम आणि सकारात्मक दृष्टीकोन नशीब देखील बदलून टाकतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे "लातूरचा गौस शेख". दोन्ही हात नसताना पायानं परीक्षा देऊन त्यानं बारावीत ७८ टक्के मार्क मिळवलेत.
गौसला मित्रांची मोठी साथ :जन्मतः दोन्ही हात नसताना सर्व कामं पायानं करणारा गौस, हा गरीब कुटुंबातील आहे. त्याचे वडील अमजद शेख आश्रम शाळेत सेवक म्हणून काम करतात. याच आश्रम शाळेत गौसनं पहिलीपासूनचं शिक्षण घेतलं. या शाळेच्या परिसरातच त्याचं वास्तव्य असून आई रजिया गृहिणी तर लहान भाऊ शोएब हा याच शाळेत शिकतोय. गौसला क्रिकेट आवडतो. पायानेच बॉलिंग, बॅटिंग करत खेळण्याचा आनंदही मित्रांसमवेत तो घेतो. दैनंदिन अनेक कामात त्याला त्याच्या मित्रांची मोठी साथ मिळल्याचं तो सांगतो.
क्लास वन अधिकारी होण्याची इच्छा : गौसला आश्रम शाळेतील सुविधा वगळता अजूनही शासनाची कोणतीही मदत मिळालेली नाही. आता तरी शासनानेही दखल घ्यावी अन् मदत करावी हीच अपेक्षा गौस व्यक्त करतोय. बारावी परीक्षेतील यशानंतर गौसला स्पर्धा परीक्षेत यश मिळवून क्लास वन अधिकारी होण्याची इच्छा आहे. गौसला पुढील यशासाठी 'ई-टीव्ही भारत'च्या शुभेच्छा.
हेही वाचा -
- दहावेळा दहावी नापास झालेला मुलगा बापाच्या जिद्दीनं झाला अकराव्यावेळी पास; गावकऱ्यांनी काढली मिरवणूक - Ten Times SSC Exam Failed
- दिव्यांग मालाचं एमपीएससीत नेत्र'दीपक' यश : जन्मतःच जन्मदात्यांनी टाकलं होतं कचऱ्याच्या पेटीत - Blind Mala Success In MPSC
- कोल्हापूरच्या लेकीचा युपीएससीत झेंडा; जिल्हाधिकारी पदाला घातली गवसणी - UPSC Success Story