पुणेIllegal Drugs Saller Arrested : पुण्यात बॉडी बिल्डिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची बेकायदा विक्री करणाऱ्या जिम व्यावसायिकाला औषधांसह अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात शरीराला घातक असलेल्या मेफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शन आणि काही हार्टबीटस् आणि ब्लड प्रेशर वाढवणारी औषधेही पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहेत.
इंजेक्शनच्या 13 बाटल्या जप्त :या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिसांनी आझाद मुमताज खान (वय 41, रा. आंबेगाव ) या जिम व्यावसायिकाला अटक केली आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये कलम 336 आणि कलम 276 नुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून शरीर शरीरसौष्ठवासाठी अनेक पुरुष हे पुढे येत विविध औषधे देखील ते घेत असतात. अशातच शरीरसौष्ठवासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदा विक्री करणाऱ्या जिम व्यावसायिकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून मेफेटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या १३ बाटल्या, तसेच पाच इंजेक्शन सिरींज जप्त करण्यात आल्या आहेत.
आरोपीला घेतले ताब्यात :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३० जानेवारीला भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलिसांना सातारा रस्त्यावरील लोखंडी पुलाच्या अलीकडे एक व्यक्ती बॉडीबिल्डिंगसाठी अवैध पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचत आरोपी खान याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत तो जिम व्यावसायिक असून तो मेफेटरमाईंन सल्फेट या औषधांची अवैध विक्री करत असल्याचं समोर आलं.