मुंबई Abhishek Ghosalkar Firing : ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांचं पुत्र आणि मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar Firing) यांच्यावर फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. यात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झालाय. मॉरिस नोरोन्हा नावाच्या एका व्यक्तीनं त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. यानंतर मॉरिसनं स्वतःवरही गोळी झाडली आहे. यात मॉरिसचाही मृत्यू झालाय.
फेसबुक लाईव्ह सुरू असताना गोळीबार : अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोन्हा हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यात काही वैयक्तिक वाद झाले होते, पण ते मिटल्यानं ते एकत्र आले होते. अभिषेक यांना मॉरिसनं स्वतःच्या कार्यालयात बोलावलं आणि फेसबुक लाईव्हही केलं. त्यावेळी या दोघांनीही एकमेकांचं कौतुक केलं.
काय झालं फेसबुक लाईव्हमध्ये :मॉरिस यानं आपल्या फेसबुक अकाउंटवरून गोळीबाराचं लाईव्ह केलं असल्याचं देखील समोर आलंय. मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांनी केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये जुने वाद विसरून आता नवीन वर्षात नवीन प्रवास सुरू करत असल्याची घोषणा करत आहेत. तसंच घोसाळकर हे देखील दहा तारखेला मुंबई ते नाशिक आणि नाशिक ते मुंबईसाठी बसेस सोडणार असल्याचं यात सांगत आहेत. लोकांसाठी आम्ही एकत्र काम करणार असल्याचं या फेसबुक लाईव्हमध्ये ते सांगत आहेत. मात्र, फेसबुक लाईव्ह तीन मिनिटांचं झाल्यानंतर मॉरिस हा अचानक फेसबुक लाईव्हमधून उठून गेला आणि नंतर चौथ्या मिनिटाला मॉरिसने अभिषेक यांच्यावर गोळीबार केला.
दहिसरमध्ये गोळीबार :भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीच्या वादातून शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. या गोळीबारप्रकरणी आता हिललाइन पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांची विभागीय चौकशी केली जाणार आहे. ही घटना ताजी असतानाच गोळीबाराची दुसरी घटना गुरुवारी मुंबईत घडली.
हेही वाचा -
- मोठी बातमी! फेसबुक लाईव्हदरम्यान गोळीबार; ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू
- भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी 'या' कारणामुळं झाडल्या महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या
- भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबाराचा थरार सीसीटीव्हीत कैद, फुटेजमध्ये स्पष्ट दिसतो गोळीबार