महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेच्या 'वाघाचा' जावई शोध; पालकमंत्री अब्दुल सत्तार 'व्याघ्रदिनी'च बिबट्याला म्हणाले 'राष्ट्रीय प्राणी' - Abdul Sattar On Leopard - ABDUL SATTAR ON LEOPARD

Abdul Sattar On Leopard : आज जागतिक व्याघ्रदिन आहे. मात्र जागतिक व्याघ्रदिनीच पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी बिबट्या हा राष्ट्रीय प्राणी असल्याचं वक्तव्य केल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेच्या 'वाघा'नं बिबट्याला राष्ट्रीय प्राणी असल्याचं म्हटल्यानं याबाबतची मोठी 'खमंग' चर्चा शहरात करण्यात येत आहे.

Abdul Sattar On Leopard
संपादित छायाचित्र (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 29, 2024, 9:48 AM IST

Updated : Jul 29, 2024, 9:57 AM IST

पालकमंत्री अब्दुल सत्तार (Reporter)

छत्रपती संभाजीनगर Abdul Sattar On Leopard : बिबट्या हा राष्ट्रीय प्राणी असल्याचा जावई शोध सिल्लोड शिवसेनेचे 'ढाण्या वाघ' तथा पालकमंत्री मंत्री अब्दुल सत्तार यांनी लावलाय. महापालिकेच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांना शहरात बिबट्याचं दर्शन होत असल्यानं विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. "बिबट्या हा राष्ट्रीय प्राणी असून त्याचं संरक्षण आपल्याला केलं पाहिजे. वन विभाग तसा प्रयत्न करत आहे," असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला बिबट्या (Reporter)

पालकमंत्री म्हणाले 'बिबट्या राष्ट्रीय प्राणी' :शहरात आठ दिवसांपासून बिबट्या ठाण मांडून बसला आहे. मात्र त्याचा सुगावा अद्याप वन विभागाला लागला नाही. यावर बोलताना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी नवीनच शोध लावला आहे. बिबट्या अद्याप पकडला गेला नाही, वन विभागाचा हलगर्जीपणा आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना त्यांनी "बिबट्या हा राष्ट्रीय प्राणी असून त्याचं संरक्षण करणं हे आपलं काम आहे. वनविभाग त्यावर निश्चितच योग्य ती खबरदारी घेईल," असं सांगितलं. "याप्रकरणी पोलीस विभागाशी देखील आपण संपर्क केलेला आहे, ते आणि वन विभाग या दोघांच्या मदतीनं बिबट्या शोधला जाईल. वन विभागानं पिंजरे लावलेले असून ते त्याचा तपास देखील घेत आहेत," असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.

दहा दिवसांपासून बिबट्याचा शोध सुरू :मागील दहा दिवसांपूर्वी शहराच्या मुख्य वसाहतीत बिबट्याचा वावर असल्याचं पाहायला मिळालं. जवाहर नगर परिसर, गारखेडा, उल्कानगरी, सिडको, प्रोझोन मॉल या वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्या असल्याच्या खात्रीलायक बातम्या समोर आल्या. अनेक ठिकाणच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्याच्या हालचाली स्पष्ट कैद झाल्या. त्यानंतर वनविभागानं तातडीनं या सर्व भागांमध्ये पिंजरे लावून बिबट्याला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र बिबट्या हुलकावणी देऊन कुठं गेला? असा प्रश्न निर्माण झाला. त्यात शनिवारी ब्रिजवाडी इथं एका सुरक्षा रक्षकानं बिबट्यानं आपल्यावर हल्ला केल्याचं सांगितलं, मात्र तो बिबट्या नसून कुत्रा असू शकतो, असं वन विभागानं सांगितलं. कुठलेच पुरावे नसल्यानं त्यांनी सुरक्षा रक्षकाचा दावा फेटाळून लावला. या सर्व घटनांवर पालकमंत्री म्हणून नेमकी काय कारवाई सुरू आहे, याबाबत माहिती घेण्यासाठी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अब्दुल सत्तार यांनी बिबट्या हा राष्ट्रीय प्राणी असल्याचं सांगितलं.

हेही वाचा :

  1. आरक्षणावरून महायुतीत विसंवाद; मुस्लिम आरक्षणाबाबत मंत्री अब्दुल सत्तार आक्रमक, 'ही' केली मागणी - Abdul Sattar On Muslim Reservation
  2. संजय शिरसाट यांना पुन्हा हुलकावणी : अब्दुल सत्तार यांची छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदी वर्णी - Abdul Sattar New Guardian Minister
  3. एकनाथ शिंदेंसोबत आपला प्रासंगिक करार; कल्याण काळेंच्या जाहीर सत्कारात अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यानं खळबळ - Abdul Sattar Felicitated To Kalyan Kale
Last Updated : Jul 29, 2024, 9:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details