महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंत्री झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांचे घरात कसे स्वागत झाले? म्हणाले,"बापाच्या कुशीत शिरताना लेकींना..." - Purandar Airport

Murlidhar Mohol Pune : पुण्याचे नवनिर्वाचित खासदार आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ शपथ घेतल्यावर प्रथमच शनिवारी पुण्यात आले. मुरलीधर मोहोळ यांच्याकडे नागरी उड्डाण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. पुण्यात आल्यावर त्यांनी पुरंदर विमानतळाबाबत शपथविधीच्या अनुभवाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत घर शेवटी घर असतं, असं म्हटलयं.

Green signal from DGCA to Purandar airport says Union Minister of State Murlidhar Mohol
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Source ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 16, 2024, 9:12 AM IST

पुणे Murlidhar Mohol Pune : पुरंदर येथील प्रस्तावित मूळ जागेवरच आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याच्या प्रस्तावाला नागरी हवाई वाहतूक संचालनालयानं (डीजीसीए) मान्यता दिली आहे. त्यामुळं राज्य सरकार आता भूसंपादनाला गती देईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. शनिवारी (15 जून) पुण्यातील पत्रकार भवन येथे वार्तालाप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते.

नेमकं काय म्हणाले मुरलीधर मोहोळ? : यावेळी बोलत असताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, "पुरंदर विमानतळासाठी युती सरकारनं अगोदर जागा बघितली होती. त्या जागेला आता डीजीसीएकडून ग्रीन सिग्नल मिळालंय. तसंच नवी मुंबई विमानतळाचं कामदेखील येत्या मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. पुणे विमानतळावर नव्या टर्मिनलचं उद्घाटन झालंय. ते अद्याप सुरू करण्यात आलेलं नाही. मनुष्यबळ उपलब्ध नसल्यानं नवीन टर्मिनल सुरू करण्यात आलेलं नाही. तसंच याबाबत पत्रव्यवहार झाला असून नवीन टर्मिनल लवकरच पुणेकरांच्या सेवेत सुरू होणार आहे."


पुढं ते म्हणाले की, "गेली 30 वर्षे शहरात कुठलाही नेता आला की मी त्यांचं स्वागत करायला जात होतो. आता माझ्यासाठी जेव्हा सर्वजण आले. तेव्हा माझा पक्ष सर्वकाही करू शकतो, हे यातून स्पष्ट झालं. मला तर स्वप्नातही वाटलं नव्हतं की असं काही होईल. मी झोपेत असताना जे. पी. नड्डा साहेबांच्या पीएचा फोन आला. त्यांनी 11 वाजता मला पीएम ऑफिसला तुम्हाला शपथ घ्यायची आहे, असं सांगून बोलावलं. मी पीएम कार्यालयात गेलो असता पंतप्रधान म्हणाले, 'क्या पुणेकर कैसे हो?' त्यानंतर जे काही मंत्रीपदाबाबत झालं त्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. यासाठी मी पुणेकरांना धन्यवाद देईल", असंही मोहोळ म्हणाले.

लेकींच्या भावनांचा बांध फुटला...मंत्री मुरलीधर मोहोळ हे बऱ्याच दिवशांनी शनिवारी घरीत परतले. यावेळी त्यांच्या मुलींना अश्रू अनावर झाले. हा अनुभव त्यांनी एक्स मीडियावर शेअर केला. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, "मंत्रिपदाची जबाबदारी जाहीर झाल्यावर दिल्लीतला मुक्काम लांबल्यानंतर बऱ्याच दिवसांनी घरी आलो. मंत्री झाल्याचा सर्वाधिक आनंद आई-वडिलांना, पत्नीला, लेकींना आणि कुटुंबियांना झाला. त्यांची भेट हा दिवसातला सुवर्णक्षण होता. इतक्या दिवस मनात दाटून ठेवलेल्या माझ्या दोन लाडक्या लेकींच्या भावनांचा बांध फुटला. मंत्री झालेल्या बापाच्या कुशीत शिरताना त्यांना भरून आलेलं पाहून मलाही गहिवरून आलं. आई-वडिलांशी शी संवाद साधताना जगातलं सारं सुख याच पायांशी असल्याचीच भावना प्रबळ होती. आई, पत्नी, बहिण आणि कुटुंबियांनी औक्षण केलं. तेव्हा नकळत त्यांच्याबरोबरच माझेही डोळे पाणावले. घर शेवटी घर असतं !"

हेही वाचा -

  1. 'पैलवान ते केंद्रात मंत्री', खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पहिल्याच टर्ममध्ये मंत्रीपद कसं मिळवलं? - Murlidhar Mohol
  2. पुणे लोकसभा मतदारसंघात मुरलीधर मोहोळ विजयी; विजयानंतर दिली पहिली प्रतिक्रिया - Pune Loksabha Election 2024
  3. विकासाचे मुद्दे ते काँग्रेसकडून होणारे आरोप; भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची विशेष मुलाखत - Murlidhar Mohol Interview

ABOUT THE AUTHOR

...view details