महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खळबळजनक! शिक्षकाचं विद्यार्थिनीवर प्रेम जडलं, तिने थेट आयुष्यच संपवलं - Girl Student Suicide Case

Girl Student Suicide Case : शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमामुळे कंटाळून एका 15 वर्षीय विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची घटना आसेगाव येथे घडलेली आहे. या प्रकरणी मृत मुलीच्या कुटुंबीयाच्या तक्रारीवरून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आरोपी शिक्षक जयवंत सासवडे याला अटक करण्यात आली आहे.

Girl Student Suicide Case Thane
आत्महत्या फाईल फोटो (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 1, 2024, 9:57 PM IST

छत्रपती संभाजीनगर Girl Student Suicide Case: शिक्षकानं एकतर्फी प्रेमापायी छळ केल्यानं विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आसेगाव येथील एका इंग्रजी विद्यालयातील ३५ वर्षीय शिक्षकानं वर्गातील नववीच्या विद्यार्थिनीला एकतर्फी प्रेमापायी छळलं. या त्रासाला कंटाळून १५ वर्षीय मुलीनं आत्महत्या केली. मुलीच्या आत्महत्येच्या तेरा दिवसांनी या प्रकरणी कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षक अजय जयवंत सासवडे याला अटक करण्यात आली आहे.

मुलीनं केली आत्महत्या :आसेगाव येथील इंग्रजी विद्यालयात नववी वर्गात शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलीनं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मात्र, कुठलीही चिठ्ठी सापडली नसल्यानं ही आत्महत्या का केली? याबाबत माहिती न मिळाल्यानं दौलताबाद पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. 17 मे रोजी तिनं आत्महत्या केली. ३० मे रोजी आई मुलीचं दप्तर पाहत होती. तेव्हा त्यात स्मार्टवॉच आढळली त्यात डिस्प्लेवर शाळेतील शिक्षक असलेले अजय सासवडे याचा वॉलपेपर होता. अजयनेच ते बळजबरीनं घड्याळ दिल्याची आईला खात्री पटली. त्यासोबत दोन पत्रे देखील आढळली. अजयनं बळजबरीनं प्रेमसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं होतं अशी तक्रार आईनं दौलताबाद पोलिसांकडे केली.

एक वर्ष आधी शाळेनं दिली होती कल्पना :मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर दौलताबाद पोलिसांनी तातडीनं शिक्षक अजय सासवडे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. शिक्षक आणि मुली बाबत उलटसुलट चर्चा सुरू असल्याची माहिती कुटुंबीयांना 2023 मध्ये मिळाली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलीला शाळेतून काढण्याचा निर्णय घेतला; मात्र तुमची मुलगी हुशार आहे तिला शिकू द्या, असा पवित्रा शाळेनं घेतला. शिक्षकाला समजावून सांगण्याची जबाबदारी शाळेनं घेतली. त्यानंतर मुलीनं देखील तक्रार नसल्याचं सांगितलं. त्यामुळे कुटुंबीयांचा समज झाला की, आता हा शिक्षक मुलीला त्रास देत नसावा. मात्र मुलीच्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना धक्का बसला. गुन्हा दाखल होताच उपनिरीक्षक दीपक पारधे यांनी त्याला अटक केली आहे; मात्र गुरू आणि शिष्याच्या नात्याला या निमित्तानं काळीमा फासला गेला असंच म्हणावं लागेल.

हेही वाचा:

  1. सलमान खानवर हल्ल्याचा आणखी एक कट; बिश्नोई गँगच्या 4 शूटर्संना अटक, हल्ल्यासाठी मागवणार होते पाकिस्तानातून शस्त्र - Salman Khan Firing Case
  2. सुनील टिंगरे यांच्यावर होणारे आरोप बिनबुडाचे; पुणे अपघात प्रकरणी अजित पवारांकडून पाठराखण - Pune Porsche Accident
  3. केरळात मान्सून दाखल, मुंबई आणि महाराष्ट्रात कधी? वाचा काय म्हणाले हवामान तज्ञ - Monsoon Update

ABOUT THE AUTHOR

...view details