महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घाटकोपर दुर्घटनेत बचाव कार्य सुरू असताना पेट्रोल पंपाला आग - ghatkopar hoarding collapse - GHATKOPAR HOARDING COLLAPSE

Ghatkopar petrol pump fire : घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनेच्या ठिकाणी पेट्रोल पंपाला आग लागल्याची घटना घडली आहे. अग्नीशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Ghatkopar petrol pump fire
प्रतिकात्मक (ETV Bharat archive Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2024, 8:41 AM IST

Updated : May 15, 2024, 10:23 AM IST

मुंबईGhatkopar petrol pump fire : घाटकोपर दुर्घटनेतील बचाव कार्य सुरू असताना पेट्रोल पंपाला आग लागण्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सोमवारी संध्याकाळी घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झालाय. या घटनेत आतापर्यंत 89 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत महाकाय होर्डिंग हटवण्याचं काम NDRF तसंच मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून अद्यापही सुरू आहे. या घटनेत दोन दिवसानंतरदेखील होर्डिंग हटवण्याचं काम सुरू आहे. होर्डिंगच्या ठिकाणी पेट्रोल पंप असल्यानं एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून काळजीपूर्वक होर्डिंग हटवण्याचं काम सुरू असताना पेट्रोल पंपाला आग लागण्याची घटना घडली आहे.

कोणतीही जीवितहानी नाही : याबाबत अधिक माहिती अशी की, होर्डिंग पडल्यानंतर आज सलग तिसऱ्या दिवशी देखील बचावकार्य सुरूच आहे. जड लोखंडी रॉड कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस कटरमुळं आज आग लागली. मुंबई अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी हजर होतं. त्यांनी दहा मिनिटांत आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचं अग्निशामन दलाकडून सांगण्यात आलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आलं आहे.

होर्डिंग पडून मोठी दुर्घटना :मुंबईत सोमवारी वादळी वाऱ्यामुळं घाटकोपर परिसरात मोठं होर्डिंग पडून मोठी दुर्घटना घडली होती. या घटनेतील मृतांची संख्या मंगळवारी पहाटे 14 झाली असून किमान 88 जण जखमी झाले आहेत. होर्डिंगखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकांनी रात्रभर बचावकार्य केलं. महापालिकेच्या परवानगीशिवाय हे होर्डिंग उभारण्यात आल्याच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

होर्डिंग्जला परवानगी नाही : पंत नगरमधील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या बाजूला असलेल्या एका पेट्रोल पंपावर होर्डिंग पडलं होतं. त्यावेळी तिथं अनेक नागरिक उपस्थित होते. हे होर्डिंग अंदाजे 17,040 स्क्वेअर फूट होतं. तसंच या होर्डिंगची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सर्वात मोठं होर्डिंग म्हणून उल्लेख करण्यात आला होता. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, त्या ठिकाणी चार होर्डिंग्ज होत्या. त्या सर्वांना रेल्वे पोलिसांनी मान्यता दिली होती. होर्डिंग्ज लावण्यापूर्वी रेल्वेनं बीएमसीकडून कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती, असं बीएमसीनं दिलेल्या निवेदनात म्हटलं होतं.

मेसर्स इगो मीडियाविरुद्ध गुन्हा दाखल : 'मेसर्स इगो मीडिया' या बिलबोर्डची निर्मिती करणाऱ्या एजन्सीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर बीएमसीनं कंपनीविरोधा गुन्हा दाखल केला आहे. बीएमसीनं म्हटलं आहे की, त्यांच्या बाजूनं जास्तीत जास्त 40 x 40 चौरस फूट आकाराचं होर्डिंग्ज लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. तथापि, पडलेल्या होर्डिंगचा आकार 120 x 120 चौरस फूट होता. परवानगीअभावी BMC नं एजन्सीला सर्व होर्डिंग्ज तात्काळ काढून टाकण्याची नोटीस बजावली आहे.

  • आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना BMC आयुक्त भूषण गगराणी म्हणाले, 'हे बेकायदेशीर होर्डिंग होतं. ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या ठिकाणी रेल्वेच्या जमिनीवर चार होर्डिंग्ज लावण्यात आले असून त्यापैकी एक पडलं आहे. बीएमसी वर्षभरापासून होर्डिंग्ज लावण्यावर आक्षेप घेत आहे'.

मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केलीय. तसंच जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचं सांगितलं.

हे वाचलंत का :

  1. घाटकोपर दुर्घटना : 'त्या' 14 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? - Hoarding collapsed in Ghatkopar
  2. अदानीचा पीएम सोबत फोटो म्हणजे त्यांची पार्टनरशिप का? घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया - Wadettiwar On Ghatkopar Accident
  3. घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील आरोपी भावेश भिंडे विरोधात गुन्हा दाखल, भिंडेवर आहेत बलात्कारासह २३ गुन्हे - Case against Bhavesh Bhinde
Last Updated : May 15, 2024, 10:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details