महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण : चार आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल - Ghatkopar Hoarding Accident - GHATKOPAR HOARDING ACCIDENT

Ghatkopar Hoarding Accident Case : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी चार आरोपींविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने हे आरोपपत्र दाखल केलं आहे.

Ghatkopar Hoarding Accident
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 12, 2024, 10:42 PM IST

मुंबई Ghatkopar Hoarding Accident Case : 13 मे रोजी घाटकोपर येथे भले मोठे होर्डिंग कोसळल्याने १७ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेने नेमलेल्या विशेष तपास पथकाकडून केला जात आहे. होर्डिंग कोसळल्यापासून 59 व्या दिवशी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने न्यायालयात या प्रकरणी चार आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने जवळपास 3200 पानांचे आरोपपत्र आज न्यायालयात दाखल केले आहे. एकूण 102 साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला असून एकूण चार आरोपींविरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मुख्य आरोपी इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचा मालक भावेश भिंडे, इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माजी संचालिका जान्हवी मराठे, होर्डिंगसाठी स्टॅबिलिटी सर्टिफिकेट देणारा मनोज संगू आणि सागर पाटील यांच्या विरोधात हे आरोपपत्र किल्ला कोर्टात दाखल करण्यात आले आहे. 178 नुसार पुढील तपास या प्रकरणाचा सुरू राहणार आहे. एकूण 102 जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यामध्ये दोन महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे आणि सहा जीआरपीच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांचे आणि इतर पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

घाटकोपर येथे १३ मे रोजी भलं मोठं होर्डिंग कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी प्रशासकीय कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांना राज्य सरकारच्या गृह विभागाने निलंबित केले. घाटकोपर होर्डिंग प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली असून आयपीएस अधिकारी कैसर खालिद हे लोहमार्ग विभागाचे पोलीस आयुक्त असताना इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला डीजी ऑफिसकडून द्यावी लागणारी पूर्व परवानगी वगळून घाटकोपर येथे चार होर्डिंग लावण्यास मुभा दिली होती. त्यामुळे नागरी हक्क संरक्षण विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक कैसर खालिद यांचं अखेर निलंबन करण्यात आलं. कैसर खालिद हे १९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून मुंबई लोहमार्ग पोलिसांचे (GRP)चे तत्कालीन आयुक्त होते. त्यांच्याच कार्यकाळात घाटकोपर येथील दुर्घटनाग्रस्त होर्डिगला परवानगी देण्यात आली होती.

घाटकोपर होर्डिंगला परवानगी देताना प्रशासकीय त्रुटी आणि अनियमियततेचा कैसर खालिद यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. घाटकोपर दुर्घटनाग्रस्त होर्डिंगला परवानगी देताना पोलीस महासंचालक कार्यालयाची परवानगी घेतली नसल्याचा देखील ठपका ठेवण्यात आला आहे. घाटकोपर येथील होर्डिंगला ४० बाय ४० असे कायदेशीर आकारमान ठरलेले असताना त्या होर्डिंगला १२० बाय १४० चौरस फूट अशा मोठ्या होर्डिंगला परवानगी देऊन अधिकारांचा गैरवापर केल्याचा देखील आरोप कैसर खालिद यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा :

  1. घाटकोपर होर्डिंग प्रकरण : कैसर खालिद यांच्या पत्नीच्या कंपनीतील पार्टनर अर्शद खानची पुन्हा चौकशी - Ghatkopar Hoarding Update
  2. घाटकोपर होर्डिंग प्रकरण : जीआरपीच्या एसीपीचा नोंदवला जबाब; उद्या भिंडेला करणार न्यायालयात हजर - Ghatkopar Hoarding Collapse Case

ABOUT THE AUTHOR

...view details