महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाप्पांसाठी वेचलं आयुष्य, घरी केला हजारांहून जास्त मूर्तींचा संग्रह; जाणून घ्या ठाण्यातील गणेश भक्ताची अनोखी कहानी - Ganeshotsav 2024

Collection Of Thousands Ganesha Idols : गणपती बाप्पा हा 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती आहे. त्यामुळं सर्वजण आपल्या परीनं बाप्पांची भक्ती करत असतात. याच पार्श्वभूमीवर ठाण्याच्या दिलीप वैती या गणेशभक्तानं बाप्पाच्या सेवेसाठी आपलं आयुष्य समर्पित केलंय.

Ganeshotsav 2024 thane news dilip vaiti collected thousands ganesha idols at home
हजारो गणेश मूर्तीचा संग्रह (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2024, 10:48 PM IST

ठाणे Collection Of Thousands Ganesha Idols : ठाण्यातील राबोडी परिसरात राहणाऱ्या दिलीप वैती यांनी मागील तीस वर्षांत हजारो गणेश मूर्तींचं संकलन केलंय. त्यांच्या घरात गेल्यावर अर्धा इंचापासून ते पाच फुटांपर्यंतच्या गणेश मूर्ती बघायला मिळतात. या मूर्ती जमवून त्यांचं संगोपन करण्याचं काम ते आपल्या बहिणीच्या मदतीनं करत असतात. त्यांच्या या अनोख्या संकलनाची चर्चा आता देशभरात होत आहे.

गणेश भक्तानं केला हजारो गणेश मूर्तीचा संग्रह (ETV Bharat Reporter)


लहानपणीचा छंद जोपासला :ठाण्यातील राबोडी परिसरात राहणारे आर्टिस्ट दिलीप वैती यांची लहानपणापासूनच बाप्पांवर श्रद्धा होती. तसंच त्यांना विविध प्रकारच्या गणेश मूर्तींचं संकलन करायलाही आवडायचं. हाच छंद ते गेल्या 30 वर्षांपासून जपत आलेत. सद्यस्थितीला त्यांच्याकडं विविध प्रकारच्या अशा हजारो मूर्ती आहेत. त्यात माती, शाडू, लाकूड, सोने-चांदी, पंचधातू, तांबे, पितळ, चायना, शंख-शिंपले, फायबर, नारळ, सिरॅमिक टेराकोटा, मार्बल, काच, दगड अशा विविध प्रकारांतील गणेश मूर्तीचा समावेश आहे. अगदी पाच ग्रॅम पासून 100 किलो पर्यंतच्या गणेश मूर्तीचं जतन दिलीप वैती यांनी केलंय. त्यांच्याकडं असलेला क्रिकेट खेळणारे बाप्पा, आरामात पहुडलेले गणराय, सभागायन करताना, खुर्चीवर पुस्तक वाचताना, बुद्धिबळ खेळताना, मूषकराजांच्या शाळेत शिकवताना, व्यायाम करताना, आदिवासी वेशातील गणेशाच्या मूर्ती पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करतात. परंतु, या सर्व मूर्तींचं जतन करण्याप्रमाणे त्यांची देखभालही काळजीपूर्वक करावी लागते. त्यासाठी दिलीप वैती आपल्या बहिणीची मदत घेतात.



देशभरात आहेत चाहते :त्यांच्या या छंदामुळं देशभरातून त्यांना अनोख्या गणेश मूर्ती भेट देखील दिल्या जातात. तसंच त्यांच्याविषयी माहिती मिळाल्यानंतर देशभरातून गणेश भक्त त्यांचं संकलन पाहण्यासाठी येत असतात. तर दिलीप वैती हे व्यावसायानं कलाकार असून त्यांच्या स्केच काढण्याच्या कलेचे देखील अनेक चाहते आहेत.

हेही वाचा -

  1. गणेशोत्सव 2024; लाडक्या बाप्पाचं आगमन आणि विसर्जनाची मुंबईत काय आहे तयारी? महापालिका आयुक्तांनी चौपाट्यांवर घेतला आढावा - Ganeshotsav 2024
  2. ताशा कडाडला, ढोलही घुमला! 'नाशिक ढोल' पथकांचा आवाज देशात घुमणार; परराज्यातही क्रेझ, जाणून घ्या इतिहास - Nashik Dhol
  3. शाडूच्या गणेश मूर्तीसाठी बडगा; पण मातीच नाही, माती आणि पीओपी मूर्तींमधील फरक कसा ओळखायचा? - Ganeshotsav 2024

ABOUT THE AUTHOR

...view details