महाराष्ट्र

maharashtra

गणेशोत्सव 2024; पारंपरिक पद्धतीनं 'छत्रपती' घराण्याच्या 'शाही गणपतीचं' आगमन, खासदार शाहू महाराजांनी केली पूजा - Ganeshotsav 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2024, 8:14 AM IST

Ganeshotsav 2024 : देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. कोल्हापुरातील राजघराण्यातही बाप्पांचं आगमन झालंय. शाही लवाजम्यासह मानाच्या पालखीतून राजवाड्यात गणपती बाप्पा विराजमान झाले.

Ganeshotsav 2024
पारंपरिक पध्दतीनं गणपतीचं आगमन (Source - ETV Bharat Reporter)

कोल्हापूर Ganeshotsav 2024 :राज्यभरात विविध ठिकाणी गणरायाचं आगमन झाल्यानं सर्वत्र उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पसरलंय. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणंच राजकीय नेत्यांच्या घरी लाडके बाप्पा विराजमान झाले आहेत. कोल्हापुरातील राजघराण्यातही बाप्पांचं आगमन झालंय. शाही लवाजम्यासह मानाच्या पालखीतून राजवाड्यात गणपती बाप्पा विराजमान झाले. यावेळी खासदार शाहू छत्रपती यांच्यासह राजघराण्यातील सदस्य उपस्थित होते.

पारंपरिक पध्दतीनं गणपतीचं आगमन (Source - ETV Bharat Reporter)

कोल्हापूरच्या राजघराण्यात बाप्पा विराजमान : ऐतिहासिक करवीर नगरीचं‌ भूषण असलेल्या नवीन राजवाड्यात शाही लवाजम्यासह आणि मानाच्या पालखीतून गणपती बाप्पाचं आगमन झालं. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी याज्ञसेनीराजे छत्रपती, संभाजीराजे, संयोगिताराजे, मालोजीराजे, मधुरिमाराजे छत्रपती उपस्थित होते. यावेळी गंगावेस, शाहूपुरी कुंभार गल्ली, बापट कॅम्प, मार्केट यार्ड परिसरात लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. प्रमुख मार्ग आणि चौकाचौकांत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

कोल्हापूर पोलीस दल सज्ज :गणेशोत्सवासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस दल सज्ज झाले असून जिल्ह्यात गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे 2 हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडून पोलिसांना सहकार्य करावं असं, आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी केलंय. तसंच सार्वजनिक मंडळांनी गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुका नियमानुसार काढाव्यात, असं आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं करण्यात आलंय. त्यामुळे मिरवणुकीत लेझर लाईट, अश्लील नृत्यांगनाचा वापर झाल्यास तसचं डॉल्बीचा अतिरेक झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी दिला.

हेही वाचा

  1. गणेशोत्सव 2024; नवसाला पावणारा नागपूरचा "टेकडी गणपती", 350 वर्षांचा आहे इतिहास - Ganeshotsav 2024
  2. लोणची-पापड नाही तर.. गणपती मूर्ती व्यवसायात बचत गटातील महिलांनी घेतली गरुड भरारी; कोट्यवधींची केली उलाढाल - Ganeshotsav 2024
  3. अंबानगरीत गणरायाचं थाटात आगमन; 'नाळ'मधील चैतूनं गणेशभक्तांना केलं 'हे' आवाहन - Ganeshotsav 2024

ABOUT THE AUTHOR

...view details