महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केतन तिरोडकर यांना अटक ; ड्रग्ज माफियांवरुन देवेंद्र फडणवीसांवर केले होते गंभीर आरोप - Ketan Tirodkar Arrested - KETAN TIRODKAR ARRESTED

Ketan Tirodkar Arrested : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकी देऊन त्यांच्यावर अवमानकारक आरोप केल्याप्रकरणी माजी पत्रकार केतन तिरोडकर यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं केतन तिरोडकर यांना तीन दिवस पोलीस कोठडी ठोठवली आहे.

Ketan Tirodkar Arrested
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ETV Bharat Marathi)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2024, 11:54 AM IST

मुंबई Ketan Tirodkar Arrested :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी माजी पत्रकार केतन तिरोडकर यांना अटक करण्यात आली. केतन किरोडकर यांना न्यायालयात हजर करण्यात आलं असता, न्यायालयानं त्यांना 3 दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे. पुणे आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कारवाई करण्यापासून पोलीस अधिकाऱ्यांना रोखत असल्याचा आरोप केतन तिरोडकर यांनी केला होता.

ड्रग्ज माफियावर कारवाई करण्यापासून रोखत आहेत :केतन तिरोडकर यांनी सोशल माध्यमांवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत त्यांनी पुण्यातील देहूरोड ते मुंबई आणि गोल्ड व्हॅलीपर्यंत दहा हजार कोटींचा साठा पडलेला. मात्र पोलिसांना कारवाई करण्यापासून रोखण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यामध्ये अडकलेल्या काही मंत्र्यांना संरक्षण देण्यासाठी या प्रकरणात हस्तक्षेप करत आहेत. मी या प्रकरणातील पुरावे देण्यास तयार आहे, असा आरोप केतन तिरोडकर यांनी केला.

कारवाई करा नाहीतर बंगल्यासमोर आत्महत्या करेन :केतन तिरोडकर यांनी जारी केलेल्या व्हिडिओत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्ज माफियांवर कारवाई करण्यापासून पोलीस अधिकाऱ्यांना रोखलं आहे. काही मंत्र्यांना वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस या प्रकरणात हस्तक्षेप करत आहेत. मात्र जनतेच्या भल्यासाठी ड्रग्जवर कारवाई करण्यात यावी. जर 4 जूनचा निवडणूक निकाल लागण्याच्या अगोदर कारवाई करण्यात आली नाही, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आत्महत्या करेल, अशी धमकी केतन तिरोडकर यांनी दिली. माजी पत्रकार केतन तिरोडकर यांनी केलेल्या या गंभीर आरोपामुळं मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

  1. "राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कौरव सैन्य, त्यांच्या आघाडीची..."देवेंद्र फडवणीस यांचा इंडिया आघाडीवर निशाणा - Devedra Fadnavis on INDIA Bloc
  2. "मुंबई लुटणार्‍या घोटाळेखोरांना...", देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टोलेबाजी - Devendra Fadnavis
  3. "1999 पासूनच उद्धव ठाकरे...", देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट - Devendra Fadnavis

ABOUT THE AUTHOR

...view details