महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माजी क्रिकेटर युसूफ पठाणनं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरींचा केला पराभव - Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 : माजी भारतीय क्रिकेटपटू युसूफ पठाणनं राजकारणाच्या क्षेत्रात स्फोटक सुरुवात केली आहे. पठाण यानं पश्चिम बंगालमधील बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचा पराभव केला आहे.

Cricketer brothers Irfan and Yusuf Pathan
क्रिकेटर बंधू इरफान आणि युसुफ पठाण ((ANI Photo))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 4, 2024, 7:25 PM IST

कोलकाता - Lok Sabha Election 2024 : भारताचा माजी क्रिकेटर युसूफ पठाण यानं पहिली लोकसभा निवडणूक जिंकली आहे. युसूफ पश्चिम बंगालच्या बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाला आहे. राजकारणातील नवा चेहरा असलेल्या युसूफ पठाणनं काँग्रेसचे पाचवेळा विजय झालेल्या दिग्गज नेते अधीर रंजन चौधरी यांचा पराभव केला. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी युसूफ पठाण यांना मागे टाकून आघाडी घेतली होती, परंतु युसूफ पठाणनं जोरदार पुनरागमन करत बाजी मारली आहे.

युसुफ पठाण आणि अधीर रंजन चौधरी ((ANI Photo))

अधीर रंजन चौधरी यांचा धक्कादायक पराभव

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बहरामपूर मतदारसंघातील पराभव हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानलं जात आहे. क्रिकेटनंतर पहिल्यांदाच राजकारणात प्रवेश करणाऱ्या माजी फलंदाज युसूफ पठाणनं राजकीय खेळपट्टीवरही चमकदार फलंदाजी केली. युसूफ पठाणच्या या दणदणीत विजयाचा अंदाज यावरून लावता येतो की त्यांनी काँग्रेसचे उमेदवार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते चौधरी यांचा पराभव केला आहे. या जागेवर युसूफ यांनी 76 हजारांहून अधिक मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे.

बहरामपूर ही काँग्रेसची सुरक्षित जागा

काँग्रेसचे प्रमुख नेते अधीर रंजन चौधरी यांचा पराभव करण्यात युसूफ पठाण यशस्वी ठरला. चौधरींसाठी बहरामपूर नेहमीच सुरक्षित जागा मानली जात होती. त्यामुळे पठाण आणि ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही आणखी एक यशस्वी कामगिरी ठरली आहे. ममता बॅनर्जींची जबरदस्त लाट असतानाही चौधरी यांनी या क्षेत्रात आपली पकड कायम ठेवली होती.

देशातील सर्व 543 लोकसभा जागांवर आज मतमोजणी सुरू आहे. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 303 जागा जिंकल्या होत्या. त्यांच्या एनडीए आघाडीला 353 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस 52 जागांवर घसरली होती. मात्र देशभरात एनडीएला अपेक्षित यश मिळू शकलं नाही. स्वबळावर बहुमत गाठण्यातही भाजपाला अपयश आलं. मात्र एनडीच्या सहकारी पक्षांच्या मदतीनं बहुमताचा आकडा त्यांनी पार केला आहे.

हेही वाचा -

अजित पवारांना दे धक्का! बारामतीत सुप्रिया सुळे यांचाच डंका, तब्बल दीड लाखानं नणंद बाई सुनेत्रा पवार यांना हरवलं - Baramati Lok Sabha Results

छत्रपती शाहू महाराजांचा मंडलिकांना धोबीपछाड, कालच लागलं होतं विजयाचं बॅनर - Lok Sabha Election Result 2024

बच्चा अभी बडा हो गया है; निवडणूक निकालावरून रोहित पवार यांचा महायुतीला टोमणा - Lok Sabha Election Results 2024

ABOUT THE AUTHOR

...view details