महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात बिबट्या आल्याचा गैरसमज आणि वनविभागाची तारांबळ, गुरगुरणारा निघाला कुत्रा - Leopard in Kolhapur - LEOPARD IN KOLHAPUR

Leopard in Kolhapur : बिबट्या असल्याच्या गैरसमजातून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाची झोप उडाली होती. अखेर परिसर आणि सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्या प्राण्याचा शोध लागला. वाचा संपूर्ण बातमी....

Leopards in Kolhapur
कोल्हापुरात बिबट्या आल्याचा गैरसमज (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2024, 10:04 PM IST

कोल्हापूर Leopard in Kolhapur :मध्यवस्तीत बिबट्या आल्याचा गैरसमज झाला होता. त्यामुळं प्रशासनाची तारांबळ उडाली. एका शैक्षणिक संस्थेच्या परिसरात असलेल्या इमारतीत कुत्रा गुरगुरत असल्यानं परप्रांतीय जोडप्याला तो बिबट्या असावा असा संशय आला आणि त्यांनी वन विभागाला फोनही केला. चार तासाच्या प्रयत्नानंतर अखेर परिसरासह सीसीटीव्हीची पाहणी करुन, गुरगुरणारे ते कुत्रे असल्याची खात्री झाल्यानंतर यंत्रणेने सुटकेचा निःश्वास सोडला.

शोधमोहीम राबवली : शहराच्या मध्यवस्तीत उच्चभ्रू नागाळा पार्कात एका शिक्षण संस्थेच्या परिसरात बांधकाम सुरू आहे. येथे कामास असलेले एक परप्रांतीय मजूर दाम्पत्य शेडमध्ये झोपले होते. पहाटे त्यांना गुरगुरण्याचा आवाज येऊ लागल्याने, तो बिबट्याच असावा या समजुतीनं त्यांनी पोलिसांना फोन लावला. मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांसह महानगरपालिकेचे अग्निशमन दल आणि वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

समोर आला कुत्रा : पहाटे साडेचारपासून त्यांनी परिसरात त्या बिबट्याची शोध मोहीम सुरू केली. शाळा आणि कॉलेजच्या सर्व वर्ग खोल्यांचीही तपासणी केली. यावेळी परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले, तेव्हा गुरगुरणारे कुत्रे असल्याची खात्री सर्वांना झाली. त्यामुळं वनविभागासह पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकानं सुटकेचा निःश्वास टाकत, शाळा, कॉलेज सुरू करण्यास हिरवा कंदील दिला.

तो वन्य प्राणी बिबट्या नसून कुत्रा :"सोमवारी पहाटे चारच्या दरम्यान कोल्हापूर शहरातील विवेकानंद कॉलेज परिसरात बिबट्या आल्याची तक्रार आली होती. त्यानंतर अग्निशामक दल, शाहूपुरी पोलीस स्टेशन, व वन विभाग येथील कर्मचारी तत्काळ घटनास्थळी हजर झाले होते. पूर्ण परिसराची पाहणी केली असता, तो बिबट्या नसून, कुत्रा असल्याचे लक्षात आले. तरीही तक्रार भीतीपोटी गैरसमजातून असल्याचे निष्पन्न झाले. कोल्हापूर शहर व परिसरातील नागरिकांना वन विभागातर्फे आव्हान करण्यात येतं की, अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. वन्य प्राणी निदर्शनास आल्यास तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा," अशी विनंती वन विभागाचे वन्यजीव बचाव पथक प्रमुख प्रदीप सुतार यांनी नागरिकांना केली.

हेही वाचा

  1. आई-वडिलांच्या कष्टाचं चीज, पेंटर कामगाराचा मुलगा झाला 'क्लास वन अधिकारी', गावात जंगी स्वागत - MPSC Success Story
  2. ‘धर्मवीर 2’ चित्रपटावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, "तुमचा हेतू स्पष्ट असेल तर..." - Supriya Sule
  3. 'आम्ही खेळायचं की नाही...?' खेळाडूंवरच आली उपोषणाला बसण्याची वेळ - Sportspersons Protest

ABOUT THE AUTHOR

...view details