महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऐन निवडणुकांच्या तोंडावर मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयाला आग; परिसरात धुराचे लोट - Mumbai BJP Office Fire - MUMBAI BJP OFFICE FIRE

Mumbai BJP Office Fire : मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयाला शॉर्टसर्किटमुळं आग लागल्याची घटना रविवारी (21 एप्रिल) घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर ही आग नियंत्रणात आली.

Fire Breaks Out BJP Office
BJP प्रदेश कार्यालयाला आग

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 21, 2024, 5:44 PM IST

Updated : Apr 21, 2024, 10:56 PM IST

प्रतिक्रिया देताना आमदार प्रसाद लाड

मुंबई Mumbai BJP Office Fire : मुंबईतील नरिमन पॉईंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयातील मंडपाला सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली. या आगीमुळं परिसरात सर्वत्र धुराचे लोट पसरले होते. परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत दहा मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. भाजपा प्रदेश कार्यालयाला आग लागली अशी माहिती, सर्वत्र पसरल्यानं भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांची एकच खलबल उडाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि आमदार प्रसाद लाड हे घटनास्थळी दाखल झाले.

दहा मिनिटात आगीवर नियंत्रण : देशभर सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्याचबरोबर राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. असं वातावरणात मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयातील सभा मंडपाला आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आग लागली. भाजपा प्रदेश कार्यालयातील किचनमध्ये वेल्डिंगचं काम सुरू असल्याचं सांगितलं जातय. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागल्याचं प्रथम दर्शनी सांगण्यात येत आहे. आग लागल्याबरोबर प्रदेश कार्यालयात आणि आजूबाजूच्या परिसरात सर्वत्र धुराचे लोट पसरले. या आगीचं नेमकं कारण समजू शकलं नसलं तरी काही क्षणात कुलाबा फायर ब्रिगेडच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी दहा मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवलं. आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसून साधन सामुग्रीचंही नुकसान झालं नसल्याचं भाजपा नेते, आमदार प्रसाद लाड यांनी सांगितलंय.

सोमवारी दहा वाजल्यापासून कार्यालय पूर्वपदावर: या आगीची माहिती देताना भाजपा नेते, आमदार प्रसाद लाड म्हणाले की, भाजपा प्रदेश कार्यालयातील सभा मंडपास आग लागली. यादरम्यान भाजपा प्रदेश कार्यालय ६० ते ७० कर्मचारी कार्यकर्ते उपस्थित होते. आगीची माहिती भेटताच कुलाबा अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नाने काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवलं. निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार सामग्री प्रदेश कार्यालयात आणली गेली होती. परंतु, मार्च महिन्यामध्ये त्याचं संपूर्ण राज्यभरात वाटप केलं गेलं असल्यानं कुठल्याही पद्धतीचं साधन सामुग्रीचं नुकसान या आगीत झालं नाही. येत्या २४ तासात आगीचं नेमकं कारण काय आहे, याचा अहवाल अग्निशमन दलाकडून प्राप्त झाल्यानंतर त्याबाबत योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचं प्रसाद लाड यांनी सांगितलंय. त्याचबरोबर उद्या सकाळी दहा वाजल्यापासून भाजपा प्रदेश कार्यालय नियमितपणे सुरू होणार असल्याचंही प्रसाद लाड यांनी म्हटलंय.

राहुल नार्वेकरही घटनास्थळी दाखल: राज्यात लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याच्या प्रचारासाठी सर्वत्र नेत्यांची धावपळ सुरू आहे. भाजपाचेही अनेक नेते प्रचारात मग्न असताना भाजपा प्रदेश कार्यालयाला आग लागली, अशा पद्धतीची माहिती सर्वत्र पसरली. प्रसाद लाड हे स्वतः भायखळा येथे प्रचारात असताना त्यांना ही माहिती भेटल्याबरोबर ते ताबडतोब प्रदेश कार्यालयात पोहोचले. प्रसाद लाड येण्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही प्रदेश कार्यालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. भाजपा प्रदेश कार्यालय पूर्णपणे सुखरूप असून कुठलीही जीवितहानी आणि मालमत्तेचं नुकसान झालं नसून भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांनी घटनास्थळी येण्याची गरज नसल्याचंही प्रसाद लाड यांनी सांगितलंय.

हेही वाचा -

  1. जळगावात केमिकल कंपनीला भीषण आग; अनेक कर्मचारी जखमी, पाहा व्हिडिओ - Fire in Jalgaon MIDC
  2. भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग; 100 पेक्षा जास्त दुकानं आगीत भस्मसात - Fire Breaks Out in Pimpri Chinchwad
  3. Bhiwani Mattress Factory Fire : भिवानीतील गादी कारखान्याला भीषण आग, अनेक किलोमीटरवरुन दिसतोय धुराचा लोट - Fire Incident At Bhiwani
Last Updated : Apr 21, 2024, 10:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details