पुणे FIR On Pooja Khedkar Father : वादग्रस्त माजी अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढतच आहेत. खेडकर कुटुंबीय आता संकटात सापडल्याचं दिसून येत आहे. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्याविरोधात सरकारी कामकाजात अडथळा आणल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आज (9 ऑगस्ट) त्यांच्यावर पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सरकारी कामकाजात अडथळा आणल्याची तक्रार बुधवारी पोलिसांकडं देण्यात आली होती.
दिलीप खेडकर यांनी आणला दबाव : पूजा खेडकर या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात पूजाला स्वतंत्र केबिन द्यावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांवर दिलीप खेडकर यांनी दबाव आणला होता, असा आरोप आहे.
पूजा खेडकर यांची न्यायालयात धाव : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पूजाला स्वतंत्र केबिन द्यावं यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांवर दिलीप खेडकर यांनी दबाव आणला होता, असा आरोप आहे. आता याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पूजा खेडकर यांची भारतीय प्रशासकीय सेवेतून निवड रद्द करण्यात आली. याविरोधात पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. UPSC नं घेतलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी पूजा खेडकर यांनी याचिकेद्वारे दिल्ली उच्च न्यायालयात केली आहे.
मदत करणाऱ्यांवर कारवाई करा : युपीएससीनं पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द केलीय. तसंच त्यांना यापुढं कोणत्याही सरकारी परीक्षेला बसण्यापासून मज्जाव करण्यात आलाय. "हे पद तात्पुरत्या स्वरूपात जरी काढण्यात आलं असलं तरी, पुढे याची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. तसंच खेडकर यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्यांच्यावर देखील कारवाई करायला पाहिजे. या प्रकरणाचा मुळापर्यंत तपास व्हायला पाहिजे," अशी मागणी पूजा खेडकर प्रकरण समोर आणणारे सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली.
हेही वाचा
- पूजा खेडकर यांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; यूपीएससीनं उमेदवारी रद्द केल्यानं दाखल केली याचिका - Puja Khedkar Moved Delhi High Court
- कोणत्या पूजा खेडकर यांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव?...पूजा खेडकर की पूजा दिलीपराव खेडकर ? विजय कुंभार यांचा सवाल - Pooja Khedkar Case