महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दूध चोरल्यानं कामावरुन काढल्याचा राग; माथेफिरुचा महंत माधवाचार्यांवर हल्ला, कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Malad Priest Attack Case - MALAD PRIEST ATTACK CASE

Malad Priest Attack Case : आश्रमातून दूध चोरणाऱ्या गोसेवकाला कामावरुन काढल्याच्या वादातून महंतावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक बाब मालाडमध्ये घडली आहे. या प्रकरणी दोन हल्लेखोरांवर कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Malad Priest Attack Case
संपादित छायाचित्र (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 25, 2024, 7:32 AM IST

मुंबई Malad Priest Attack Case : मालाड पूर्व इथल्या हनुमान मंदिरातील गुरु श्री महंत माधवाचार्यजी उर्फ माधवदासजी रामबालकदास महात्यागी ( वय 67 वर्षे ) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी हनुमान मंदिराच्या वॉचमननं दिलेल्या तक्रारीवरुन कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालाड इथल्या महंतावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 109 (1), 3(5), 37 (1) (अ ) आणि 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुरार पोलीस तपास करत असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नसल्याची माहिती कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे यांनी दिली आहे.

महंत माधवाचार्यजी उर्फ माधवदासजी रामबालकदास महात्यागी (Reporter)

हनुमान मंदिराच्या वॉचमननं दाखल केली तक्रार :मालाड इथल्या संकटमोचन विजय हनुमान टेकडीवर मंदिर आहे. या मंदिराच्या महंतावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. या प्रकरणी मंदिरात राहणाऱ्या वॉचमन विपन रामरतन यादव यांनी कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विपन यादव यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार सूर्यनारायण दास आणि एका अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुरार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रफिक मुजावर यांनी वॉचमनचा जबाब नोंदवला आहे.

सिताराम सिताराम म्हणत टाळ्या वाजवत आला अन् केला हल्ला :या जबाबात वॉचमननं सांगितलं की, "तपोवन हनुमान मंदिर इथं महंत माधवाचार्य उर्फ माधवदास रामबालकदास महात्यागी हे तिथं मठाधिपती आहेत. त्यांच्या सांगण्यानुसार मंदिर आणि गौशाळेचा कारभार चालतो. इथं मंदिर व्यवस्थापनासाठी इतर साधू असून गौशाळेसाठी गौसेवक आहेत. महंत माधवाचार्यजी उर्फ माधवदास रामबालकदास महात्यागी हे तपोवन मंदिरामध्ये धुणी मंदिरात हवन करत होते. त्यावेळी 4.45 वाजताच्या सुमारास तिथं पूजेसाठी एकजण आला. यावेळी तो सिताराम सिताराम करत टाळ्या वाजवत उभा होता. तेव्हा मी दात घासत असताना महाराजांनी मोठ्यानं ओरडून "बचाव बचाव मार रहा है। इसको पकडो" असा आरडाओरडा केला. तेव्हा एक हल्लेखोर माझ्याकडं धावत येत होता. त्याला मी लगेच पकडलं असता, त्यानं धक्काबुक्की केली आणि हातातून निसटून पळाला."

दूध चोरीतून हल्ला घडल्याचा संशय :महंत माधवाचार्य उर्फ माधवदास रामबालकदास महात्यागी यांच्यावर वार करुन जखमी केलेल्या अनोळखी हल्लेखोराचं वर्णन वॉचमन यादव यांनी पोलिसांकडं केलं आहे. "दोन महिन्यापूर्वी गोशाळेत काम करणारा गोसेवक सुर्यनारायण दास हा गाईचं काढलेलं दूध मोजमाप करणं आणि मंदिरात देणं हे काम करत होता. गाईच्या दुधाचं मोजमाप करताना सुर्यनारायण हा दुधाची चोरी करुन बाहेरील लोकांना दूध विक्री करीत असे. त्याबाबत आमच्या महाराजांना कळाल्यानं त्यांनी त्याला तसं न करण्याबाबत सांगितलं. परंतु त्यानं दूध चोरीचं काम चालूच ठेवलं. त्यामुळे महाराजांनी त्याला गौशाळेतून काढलं. तो त्यावेळी गावी जाताना रागाच्या भरात महाराजांबरोबर खुप भांडण करुन धमकी देऊन निघून गेला. सुर्यनारायण दास यानं दोन महिन्यापूर्वी कामावरुन काढून टाकल्याचा मनात राग धरुन त्यानं किंवा त्याच्या मित्रानं महाराजांना धारदार चाकूनं मानेजवळ खांद्यावर वार केल्यानं महाराज हे जखमी झाले. महाराजांच्या गळ्यावर धारदार चाकूनं वार करताना त्यांनी वार चुकवल्यानं खांद्यावर मोठी जखम झालेली आहे."

हेही वाचा :

  1. 'धर्मरक्षणासाठी जीवन समर्पित करणाऱ्या साधू-संतांच्या संरक्षणाची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घ्यावी'
  2. औरंगाबादमध्ये आश्रमात घुसून अज्ञातांची महाराजांना मारहाण
  3. गणेश गिरी महाराज हल्लाप्रकरण, 14 संशयित आरोपींना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details