महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विश्वास जिंकून केली गद्दारी, 50 कोटींचे कर्ज मिळवून देतो असे सांगून व्यावसायिकाला 2 कोटी 32 लाखांचा लावला चुना - Financial Fraud In Mumbai

Financial Fraud In Mumbai : 50 कोटींचे कर्ज मिळवून देतो अशी बतावणी करून तक्रारदार अंशुल पांडे (वय 46) या व्यावसायिकाची प्रथमेश दुबे, विनोद उपाध्याय आणि पंकज सिंग यांनी 2 कोटी 32 लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी मुंबईतील दहिसर पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम 34, 406 आणि 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Financial Fraud In Mumbai
आर्थिक फसवणूक (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 25, 2024, 9:58 PM IST

मुंबईFinancial Fraud In Mumbai:तक्रारदार व्यावसायिक अंशुल पांडे हे कांदिवली पूर्व येथील ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरात राहतात. 15 वर्षांपूर्वी त्यांनी गायत्री इन्फ्राटेक नावाची कंपनी सुरू केली होती. या कंपनीमार्फत विविध ठिकाणी जमीन खरेदी करून ती डेव्हलप करून निवासी इमारती आणि कमर्शियल गाडी यांचे बांधकाम करून विक्री करण्याचा व्यवसाय केला जातो. या कंपनीमार्फत भिवंडी मिरा रोड पनवेल इत्यादी ठिकाणी डेव्हलपमेंटचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता होती. तक्रारदार यांचे वडील हिरामणी पांडे यांचे आरोपी रत्नेश दुबे याच्या वडिलांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे पांडे आणि दुबे त्यांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते.

तक्रारदाराला कर्ज मिळवून देण्याचा ठेवला प्रस्ताव :सलोखाच्या संबंधानंतर रत्नेश दुबेचे वडील शिवशंकर दुबे यांनी तक्रारदार यांच्या वडिलांकडे त्यांच्या मिरा रोडच्या साइटवर पाणीपुरवठा करण्याचे कंत्राट द्यावे, अशी विनंती केली. ही विनंती मान्य करून रत्नेश दुबे याला मीरा रोड येथील साइटवर पाणीपुरवठा करण्याचे काम दिले होते. रत्नेश दुबे यांना ते काम व्यावसायिकरित्या पार पाडून पांडे कुटुंबाचा विश्वास जिंकला. दरम्यानच्या कोरोना महामारीत तक्रारदार यांना व्यवसायामध्ये आर्थिक चणचण भासू लागली. त्यामुळे कंपनीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँकांच्या माध्यमातून कर्ज उभारण्यासाठी तक्रारदार दुबे यांनी हातपाय मारण्यास सुरुवात केली. त्यावेळी रत्नेश दुबे यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये तक्रारदारास दहिसर पूर्व येथील राहत्या घरी बोलावून घेतले आणि त्याच्या विनोद उपाध्याय आणि पंकज सिंग या दोन मित्रांची गाठ घालून दिली. यानंतर तक्रारदाराला सहा ते आठ टक्के दराने 50 करोड रुपयांचे कर्ज मिळवून देतील असा प्रस्ताव रत्नेश दुबे यांच्या समोर ठेवला.

अशा रीतीने केली फसवणूक :प्रस्ताव आवडल्याने तक्रारदार अंशुल पांडे यांनी या प्रस्तावाला होकार दिला. त्यानंतर कर्ज मिळवून देण्यासाठी कंपनीचे तीन वर्षांचे आयटीआर आणि तक्रारदार यांच्या वडिलांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड तसेच कर्ज मंजूर करण्यासाठी पाच टक्के प्रोसेसिंग फी म्हणून दोन कोटी बत्तीस लाख रुपये मागितले. कर्ज दिल्लीवरून मंजूर होणार असल्यामुळे रजिस्ट्रेशन करता स्टॅम्प पेपर खरेदी करावे लागतील अशी बतावणी करून स्टॅम्प पेपर तेवढ्या किमतीचेच लागतील आणि ते दिल्लीवरून विकत घ्यावे लागतील असे तक्रारदार यांना सांगण्यात आले. नोव्हेंबर 2020 ते मार्च 2021 पर्यंत रोख स्वरूपात आणि बँक ट्रांजेक्शनच्या माध्यमातून रत्नेश दुबे आणि विनोद सिंग यांना तक्रारदाराने एकूण दोन कोटी बत्तीस लाख रुपयांची रक्कम दिली. नंतर रत्नेश दुबे याला दिलेली संपूर्ण रोख रक्कम त्याने त्याच्या दहिसर येथील घरामध्ये स्वीकारली. त्यानंतर तीन महिने उलटून गेले तरी देखील कर्जाच्या प्रक्रियेबाबत काहीही हालचाल नसल्याने तक्रारदार पांडे यांनी रत्नेश दुबे याच्याशी संपर्क साधला तेव्हा त्याने रजिस्ट्रेशन करता स्टॅन्ड पेपर मिळाले आहेत; मात्र बॅग चोरीला गेली आहे. त्यामुळे थोडा वेळ द्या अशी बतावणी केली.

आरोपींकडून उडवाउडवीची उत्तरे :कर्जमंजुरीबाबत विचारणा करण्यासाठी तक्रारदार अंशुल पांडे यांनी रत्नेश दुबे, विनोद उपाध्याय आणि पंकज सिंग या तिघांना वेळोवेळी संपर्क केला; मात्र त्यांनी प्रत्येक वेळेस तीच कारणे सांगून टाळाटाळ केली. रत्नेश दुबे यांनी स्वीकारलेली रक्कम परत मागितली असता तक्रारदार यांना उडवा-उडवीची उत्तरे देऊन धमकी देण्यात आली. त्यानंतर या प्रकरणी तक्रारदार अंशुल पांडे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव जठार यांनी तक्रारदाराचा जबाब नोंदवून दहिसर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

हेही वाचा :

  1. नशेडी कारचालकानं आईसह दीड महिन्यांच्या बाळाला उडवलं; कारचालकानं गुन्हेगारी कनेक्शन, नेमकं काय घडलं? - Hit And Run Case Nagpur
  2. अमरावतीतही 'हिट अँड रन', भरधाव कारनं एकाला चिरडलं; 22 दिवसानंतरही गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांना अपयश - Amravati Accident News
  3. पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग अ‍ॅक्शन मोडवर; शहरातील 49 पब आणि बारवर कारवाई - Action Against Pubs And Bar In Pune

ABOUT THE AUTHOR

...view details