महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठा आरक्षणासाठी मुलानं केली आत्महत्या अन् बापाचं खरं बिंग फुटलं - Son Murder Case - SON MURDER CASE

Son Murder Case : मुलाने मराठा आरक्षणासाठी राहत्या घरी गळफास घेतल्याची तक्रार जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी पोलीस ठाण्यात केली होती; मात्र वैद्यकीय अहवालावरून मुलाचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचं निष्पन्न झालं. यावरून जालन्यातील तीर्थपुरी पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली.

Son Murder Case
हत्याकांड (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 9, 2024, 8:48 PM IST

मुलाच्या खुनाविषयी माहिती देताना पोलीस अधिकारी (Reporter)

जालनाSon Murder Case:मराठा आरक्षणासाठी मुलाने आत्महत्या केल्याचा बनाव करून बापानेच खून केल्याचा गुन्हा जालना जिल्ह्यातल्या मुरमा गावात उघडकीस आलाय. 23 फेब्रुवारी 2024 या दिवशी शिवप्रसाद महादेव थुटे याने मराठा आरक्षणासाठी राहत्या घरात गळफास घेतल्याची तक्रार तीर्थपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनास पाठवून नोंद केली होती; मात्र त्याचा अहवाल आल्यानंतर त्याचा गळा दाबून खून केल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर पोलिसांकडून मयताच्या आई-वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं असता बापानेच दारूच्या नशेत मुलाचा गळा दाबून खून केल्याचं उघडकीस आलं आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी वडील महादेव थुटे याला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे. आज दि ९/५/२०२४ रोजी आरोपी बापाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

विष पाजून मुलाची हत्या : वडिलांकडून मुलाची हत्या करण्यात आल्याची अशीच एक घटना सोलापूर शहरात घडली होती. यामध्ये शाळेत खोड्या काढत असल्यानं तसंच वारंवार मोबाईल मागितल्यानं एका बापानं आपल्या मुलाला थंड पेयातून विष पाजल्याची घटना 1 फेब्रुवारी, 2024 रोजी घडली होती. या घटनेनं सोलापूर शहर हादरलं होतं. 13 जानेवारी रोजी रात्री 10 च्या सुमारास सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील सर्व्हिस रोडजवळील नाल्याजवळ एका मुलाचा मृतदेह आढळून आला होता. याची माहिती मिळताच जोडबावी पेठ पोलिसांनी मुलाला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनी तपास केला असता निलेश कुमार (नाव बदलेलं आहे, वय 14 वर्षे ) असं या मुलाचं नाव आहे. तर रमेश कुमार, असं क्रूर पित्याचं नाव आहे.

302 अन्वये गुन्हा दाखल :सायंकाळी निलेश घरातून निघून गेला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत घरापासून घटनास्थळापर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांच्या तपासात फिर्यादीच्या पतीनं म्हणजेच मृत मुलाच्या वडिलांनीच हा खून केल्याचं स्पष्ट झालं आहे. मृत मुलाच्या वडिलांनी म्हणजेच आरोपीनं दिलेली माहिती अशी की, निलेश शाळेत, शेजाऱ्यांशी सतत खोड्या काढायचा. शाळेतील सततच्या तक्रारीमुळं रागाच्या भरात थंड पेयात विषारी पावडर मिसळून निलेशची हत्या केल्याची कबुली वडिलांनी दिली आहे. या गुन्ह्यासंदर्भात जोडबावी पेठ पोलीस ठाण्यात भादंवि 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

  1. मतदान टक्का वाढल्यानं पेटलं रान; पराभवाच्या भीतीनं विरोधकांचा पळवाट शोधण्याचा प्रयत्न, सत्ताधाऱ्यांचा आरोप - Lok Sabha Election Voting
  2. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी निवडणूक प्रचारात; "ठाकरेंची ‘मशाल‘ दहशतवाद्यांच्या हाती" - Lok Sabha Election 2024
  3. महाविकास आघाडीला राज्यात किती जागा मिळतील? शरद पवारांनी सांगितला थेट आकडाच! - Lok Sabha Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details