छत्रपती संभाजीनगर Tabla Maestro : वेस्ट इंडिजमध्ये पार पडलेल्या टी 20 क्रिकेट विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघानं विजेतेपद पटकावलं. यानंतर देशाची मान उंचावणारा संघ गुरुवारी मायदेशी परतणार आहे. त्यांचं देशभरात स्वागत केलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरातील प्रसिद्ध तबला वादक शरद कुमार दांडगे यांनी अनोख्या पद्धतीनं भारतीय संघाचं स्वागत केलय. वेगवेगळे राज्य वेगवेगळी संस्कृती असलेला आपला देश आहेत. जसं राज्य, प्रांत तसं त्यांचं संगीत देखील वेगवेगळी आहेत. अनंत बोलीभाषा देश एक अशी ख्याती आहे. त्यामुळं वेगवेगळ्या संस्कृतीचं संगीत तबल्याच्या माध्यमातून वाजवत एकत्र बांधून त्यांनी क्रिकेट खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
तबला भेदभाव करत नाही : वेगवेगळ्या राज्यातील खेळाडू एकत्र येत संघ तयार होतो. देश सर्व प्रांतांना बांधून ठेवतो. भारतीय संघ विश्वविजेता झाला आहे. त्यांचं अभिनंदन करण्यासाठी देशात स्वागत केलं जातंय. त्यांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यासाठी तबल्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्याची वाद्यं वाजवत प्रसिद्ध तबला वादक शरद कुमार दांडगे यांनी खेळाडूंचं स्वागत केलं. संगीत कोणती जात समाज पाहात नाही. तर राज्यांच्या आणि देशांच्या सीमा तोडून सर्वांना एकत्र आणतं. त्यामुळं ज्या राज्यातून खेळाडू येतो त्या त्या राज्यातील संगीत तबल्याच्या माध्यमातून सादर करत त्यांनी अनोखं स्वागत केलं. महाराष्ट्रात राहणारे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांच्यासाठी ढोलकी, पंजाबमधील अर्शदीप सिंगसाठी पंजाबी ढोल, उत्तर भारतातील विराट कोहली, कुलदीप यादव, शिवम दुबे, गुजरात येथील रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या यांच्यासह सर्व खेळाडूंसाठी त्यांच्या त्यांच्या राज्यातील ढोलकी, पखवाज, मृदंग सारखे वाद्य तबल्यासह वाजवून अनोखं अभिनंदन केलं आहे.