महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वडिलांना विमानात सोडण्यासाठी त्यानं बनविले बनावट तिकीट, अटकेतील आरोपीची चौकशी सुरू - Fake flight ticket - FAKE FLIGHT TICKET

पुणे विमानतळावर इंडिगो एअर लाईन्सचे पुणे ते लखनौ प्रवास करणाऱ्या एका प्रवासाच्या मुलानं चक्क वडिलांना विमानात सोडण्यासाठी बनावट तिकीट घेतले. इंडिगो एअर लाईन्सची फसवणूक करणाऱ्या या आरोपीला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.

Fake flight ticket
Fake flight ticket (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 12, 2024, 7:09 PM IST

पुणे-आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे बनावट विमान तिकीटाचा प्रकार आढळून आला. लखनौला जाणाऱ्या विमानात बनावट तिकिटासह चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवासाचा कट सुरक्षा अधिकाऱ्यांनी उधळून लावला. ही घटना रविवारी पहाटे 3 वाजून 55 मिनिटाला घडली आहे. या प्रवाशाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. सलीम खान असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

सलीम खाननं उत्तर प्रदेशातील त्याच्या मित्राकडून खासगी विमान कंपनीचं तिकीट घेतलं होते. पण, हे तिकीट बोगस होते. त्यामुळे पोलिसांनी सलीम खान आणि त्याचा मित्र नसरुद्दीन खान यांच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सलीम खान (Source- ETV Bharat)

वडिलांना भेटण्याकरिता विमानतळावर आला-सलीन खाननं विमानतळाच्या चेक-इन किओस्कवर दाखविलेला तिकिटाचा पीएनआर क्रमांक बोगस असल्याचं केंद्रीय सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना आढळलं. चौकशीदरम्यान त्यानं सांगितलं की, लखनौला इंडिगोच्या विमानानं जाणाऱ्या वडिलांना भेटण्याकरिता विमानतळावर आला. त्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता त्याच्या वडिलांच्या तिकिटाचा पीएनआर क्रमांक खरा असल्याचं आढळलं.

आरोपीकडून वेगवेगळी कारणे-सलीम खानची पोलिसांनी चौकशी केली. त्यानं सांगितलं की, "साडेसहा हजार रुपये देऊन मित्राकडून बोगस पीएनआर असलेले तिकीट मिळवलं होते. पोलिसांकडून सलीम खानची चौकशी सुरू आहे." मात्र, त्यानं लखनौला जाणारं तिकीट का घेतलं? याबाबत आरोपी सतत वेगवेगळी कारणं सांगत आहे. एकीकडं त्यानं वडिलांना भेटण्यासाठी आल्याचा दावा केला. तर दुसरीकडं तो लखनौच्या प्रवासासाठी बोगस तिकीट घेऊन आला होता.

कोणताही दहशतवादी अँगल-पुणे पोलीस आयुक्त अमीतेश कुमार म्हणाले, " रविवारी पुणे विमानतळावरून पुणे ते लखनौ प्रवास करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिक प्रवासाच्या मुलानं आपल्या वडिलांना सोडण्यासाठी विमानाचं बनावट तिकीट बनविलं आहे. याचा तपास अधिक सुरू आहे. यात कोणताही दहशतवादी अँगल नाही." पोलिसांनी सलीम खानला (रा. विद्यानगर) एमआयडीसी मोहननगर चिंचवड येथून अटक केली आहे.

  • काय असतो पीएनआर क्रमांक-पॅसेंजर नेम रेकॉर्ड (PNR) हा विमान उड्डाणांसाठी प्रवाशांना दिलेला विशिष्ट क्रमांक असतो. हा क्रमांक एखाद्या डिजिटल प्रमाणपत्रासारखा असतो. त्यामुळे प्रवाशांना ऑनलाइन चेक-इन करता येते. तसेच कमी वेळात त्यांचे बुकिंगचे व्यस्थापन करता येते.

हेही वाचा-

  1. लखनऊला येणाऱ्या एयर इंडिया विमानाचं दुबई विमानतळावर इमर्जन्सी लँडींग - Emergency Landing In Dubai
  2. एअर इंडियाकडून देण्यात येणाऱ्या जेवणात आढळलं ब्लेड, प्रशासनानं मागितली माफी - Air India Flight

ABOUT THE AUTHOR

...view details