पुणे-इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करून जिवे मारण्याची धमकी दिल्यानं एकच खळबळ उडालीय. याबाबत इंद्रजित सावंत यांनी स्वतः माहिती दिली असून, पत्रकार परिषद घेऊन ते भूमिकाही स्पष्ट करणार आहेत. त्यानंतर आता संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली असून, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देऊन तुम्ही तुमची औकात दाखवलीत. हिशेबात राहा. संभाजी ब्रिगेड त्यांच्या सोबत आहे, असंही संभाजी ब्रिगेडनं ठणकावून सांगितलंय. इंद्रजित सावंत सरांच्या केसाला जरी धक्का लावाल तर सोडणार नाही, गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे, असा थेट धमकीवजा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी दिलाय.
सावंत सरांच्या मागे संभाजी ब्रिगेड उभी : यावेळी संतोष शिंदे म्हणाले की, इंद्रजित सावंत सरांच्या मागे संभाजी ब्रिगेड उभी आहे. सावंत सर छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास राज्याच्या समोर मांडत आहेत. खरा इतिहास सांगणाऱ्याला जर कोणी जातीवादी समजत असेल तर गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे, असा इशारा यावेळी संतोष शिंदे यांनी दिलाय.
इंद्रजित सावंत यांच्या केसाला जरी धक्का लावाल तर सोडणार नाही; संभाजी ब्रिगेडचा इशारा - INDRAJIT SAWANT CASE
इंद्रजित सावंत सरांच्या केसाला जरी धक्का लावाल तर सोडणार नाही, गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे, असा थेट धमकीवजा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी दिलाय.

Published : Feb 25, 2025, 12:19 PM IST
नेमकं प्रकरण काय? : इंद्रजित सावंत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विशिष्ट समाजाबाबत द्वेष पसरवल्याचा आरोप त्यांच्यावर एका व्यक्तीनं केला असून, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून घरात घुसून मारण्याची धमकी दिलीय. इंद्रजित सावंत यांनी याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्यानं तो चर्चेचा विषय ठरलाय. धमकी देणाऱ्याने स्वतःचं नाव प्रशांत कोरटकर असल्याचं इंद्रजित सावंतांना सांगितलं. सदर व्यक्तीने थेट मुख्यमंत्र्यांच्या जातीचा उल्लेख करून आपण नागपूरमधून बोलत असल्याचं म्हटलंय. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा' चित्रपटाबाबत एका वृत्तवाहिनीला इंद्रजित सावंत यांनी खास मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी एका समाजाचा द्वेष पसरवल्याचा आरोप प्रशांत कोरटकर असं स्वतःचं नाव सांगणाऱ्या व्यक्तीने केलाय. त्यानं सेलफोनवरून इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिलीय.
हेही वाचा :