मुंबई Bhagat Singh Koshyari :आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी यापूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राज्यपाल असताना त्यांच्या संस्थेला किती देणग्या मिळाल्या? अशी विचारणा राजभवनाकडं केली होती. परंतु, राजभवनानं याबाबत त्यांच्याकडं कुठलीच माहिती नसल्याचं सांगितलं होतं. असं असतांना आता अनिल गलगली यांना एक निनावी पत्र मिळाल्या दावा केल्यानं राज्यात खळबळ उडालीय. त्या पत्राबाबत महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ईटीव्ही भारतला एक्सक्ल्यूझिव्ह प्रतिक्रिया दिली. माजी राज्यपाल कोश्यारी म्हणाले, "मी समाजासाठी काम करत आहे. माध्यम आणि आरटीआय कार्यकर्ते अशा दोघांविरोधात कोर्टात जाणार आहे. अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करणार आहे. मी त्यांना तसे कुणालाही सोडणार नाही."
15 कोटींची देणगी : आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मिळालेल्या निनावी पत्रात दावा करण्यात आलाय की, भगतसिंग कोश्यारी राज्यपाल असताना त्यांच्या शिक्षण संस्थेनं अनंत अंबानींकडून 15 कोटी रुपयांची देणगी घेतली. यानंतर अनिल गलगली यांनी हे निनावी पत्र राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पाठवून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलीय. अनिल गलगली यांनी यापूर्वी सुद्धा माहिती अधिकाराच्या अखत्यारित राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कार्यकाळात त्यांच्या संस्थेनं किती देणग्या जमा केल्या याबाबत माहिती मागवली होती. परंतु, त्यांना कुठलीच माहिती दिली गेली नाही. म्हणूनच या निनावी पत्रानंतर या प्रकरणाची चौकशी झाली तर सत्य बाहेर येईल, अशी मागणी गलगली यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याकडे केलीय.