नागपूर : विधानसभा निवडणूक 2024 च्या निकालानंतर विरोधकांनी महायुतीच्या नेत्यांवर मोठी टीका केली आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात आपली मतं मांडली पाहिजे. लोकांचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी सभागृह आहे. मात्र बाहेर नौटंकी करायची अन् सभागृहात गप्प बसायचं, असा विरोधकांचा डाव आहे. त्यामुळे विरोधकांनी जनादेशाचा अपमान करू नये, अन्यथा निवडणूक लढवू नये, असा जोरदार हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस भेटीवरुन हल्लाबोल :उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावर एकनाथ शिंदे यांनी जोरदार हल्लाबोल केला. "देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, त्यांना कोणीही भेटू शकते. मात्र जेव्हा सत्तेत होते, तेव्हा ज्यांना अटक करुन कारागृहात टाकायला निघाले होते, त्यांनी आता देवेंद्र फडणवीस यांची भेट का घ्यावी, त्यांना काहीच वाटत नाही," का असा सवाल त्यांनी यावेळी केला.