महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मंगळवारी चंद्र न दिसल्यानं भारतात 11 एप्रिलला साजरी होणार रमजान ईद - Eid ul fitra - EID UL FITRA

Eid ul fitra : भारतात 11 एप्रिलला ईद साजरी होणार आहे. सौदी अरेबिया, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आदी देशांमध्ये मंगळवारी चंद्र दिसला नाही. भारतात 10 एप्रिल रोजी चंद्राचे दर्शन होऊ शकते. त्यामुळे यंदा 11 एप्रिल रोजी ईद साजरी केली जाणार आहे.

Eid ul fitra
भारतात 11 एप्रिलला साजरी होणार ईद

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 10, 2024, 9:33 AM IST

नवी दिल्ली : Eid ul fitra : ईद-उल-फित्र हा इस्लाम धर्मातील मोठा सण आहे. हा दिवस ईद किंवा रमजान ईद म्हणून ओळखली जातो. ईद-उल-फित्र हा पवित्र रमजान महिन्याचा शेवट मानला जातो. रमजानच्या काळात मुस्लिम समाजाचे लोक उपवास ठेवतात आणि पवित्र कुराणाचे पठण करतात.

सौदी अरेबिया, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आदी देशांतील लोकांनी ११ मार्च २०२४ पासून उपवास सुरू केला. इस्लामिक कॅलेंडरनुसार रमजान हा वर्षातील नववा महिना आहे. या महिन्यात २९ किंवा ३० दिवस असतात. यंदा रमजानचे २९ दिवस पूर्ण होऊनही या देशांमध्ये ९ एप्रिलला ईदच्या चंद्राचं दर्शन झालं नाही. त्यामुळे यावेळी रमजान महिना पूर्ण ३० दिवसांचा असेल. भारतातील इस्लाम धर्मियांनी १२ मार्च २०२४ पासून उपवास सुरू करण्यास सुरवात केली होती. त्यामुळे भारतात आज म्हणजे १० एप्रिल रोजी ईद-उल-फित्रचा चंद्र दिसू शकतो. हे पाहता भारतात 11 एप्रिल रोजी ईद-उल-फित्रचा सण साजरा केला जाणार आहे.

जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी मशिदीतून घोषणा केली आहे की, आज सौदी अरेबिया, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आदी देशांमध्ये चंद्र दिसला नाही. त्यामुळे भारतात 11 एप्रिल रोजी ईद-उल-फित्र साजरी केली जाणार आहे. आज भारतातील सर्व राज्यातील लोकांशी बोलून चंद्र कुठेही दिसला नसल्याची माहिती गोळा केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, तेलंगणा, हैदराबाद, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे.

जामा मशिदीजवळील बाजारपेठेत खरेदीसाठी लोकांची गर्दी वाढली आहे. ईद-उल-फित्रच्या दिवशी जामा मशिदीत मोठ्या संख्येने लोक जमत असल्याने दिल्ली पोलिसांनी चोख विशेष सुरक्षा व्यवस्था केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details