महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नेपाळमध्ये 7.1 रिश्टर स्केलच्या भूकंपानं 32 जणांचा बळी; बिहारसह दिल्लीत बसले धक्के - EARTHQUAKE TODAY NEWS

नेपाळसह बिहार, दिल्ली एनसीआरला भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपात 32 जणांचा मृत्यू झाला.

earthquake today news
नेपाळसह बिहार दिल्लीत भूकंप (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2025, 8:36 AM IST

Updated : Jan 7, 2025, 11:53 AM IST

काठमांडू/पाटणा:नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये आज सकाळी 6 वाजून 35 मिनिटाला शक्तिशाली असा 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाच्या धक्क्यानं माऊंट एव्हरेस्टजवळील दुर्गम हिमालयीन प्रदेशाला मोठे हादरे बसलेत. या भूकंपानंतर दिल्ली-एनसीआर आणि बिहारच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार भूकंपामुळे जिजांग शहरात 32 जणांचा मृत्यू झाला असून, 38 जण जखमी झालेत.

यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील लोबुचेपासून 93 किलोमीटर (57 मैल) चीनमधील तिबेटच्या पर्वतीय सीमेवर आहे. भूकंपाच्या तीव्र धक्क्यामुळे काठमांडू आणि तेथून 200 किलोमीटरहून अधिक इमारती हादरल्या आहेत. भूकंप सुमारे 10 किलोमीटर (6 मैल) खोलीवर बसल्याचं या संस्थेनं म्हटलं आहे. भूकंपाच्या हालचालींमुळे नेपाळसह सीमेवजवळील राज्यांमध्ये चिंता वाढली आहे. नेपाळ आणि भारताच्या प्रभावित भागांतील अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

बिहारमध्ये भूकंपाचे धक्के-बिहारमध्ये भूकंपाचे धक्के बसल्यानंतर अनेक लोक घराबाहेर पडले. अचानक सकाळी झालेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.बिहारची राजधानी पाटणाशिवाय पूर्णिया, मधुबनी, शिवहार, समस्तीपूर, मुझफ्फरपूर, मोतिहारी आणि सिवानसह या जिल्ह्यांमध्ये भूकंप झाला. बिहारच्या एकूण जिल्ह्यापैकी निम्म्या जिल्ह्यात सकाळी 6.35 ते 6.37 च्या दरम्यान लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. पूर्णिया येथील रहिवासी महिलेनं सांगितलं, "सकाळी उठल्यानंतर पतीला चहा दिला. ते चहा पीत असताना अचानक त्यांच्या हातातील चहाचे कप हलू लागले. घरातील पंखेही भूकंपाच्या धक्क्यामुळे फिरत होते. जमीन थरथरत असल्याचा भास झाल्यानंतर भूकंप झाल्याचं लक्षात आले".

भूकंपामागे काय आहे वैज्ञानिक कारण?पृथ्वीच्या पोटात 7 टेक्टोनिक प्लेट्स फिरत राहतात. या प्लेट्सच्या कधी-कधी हालचाली वाढून त्या प्लेट्स एकमेकांवर आदळतात. तेव्हा प्लेट्स एकमेकांपासून सरकतात अथवा दूर जातात. त्यामुळे जमिनीला धक्के बसतो, यालाच आपण भूकंप म्हणतो. साधारणत: रिश्टर स्केलवर भूकंप 1 ते 9 पर्यंत असू शकतात.

Last Updated : Jan 7, 2025, 11:53 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details