महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर विमानतळावर कस्टम्सकडून 8 कोटी 81 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त, एकाला अटक - Narcotics Case Nagpur - NARCOTICS CASE NAGPUR

Drug Seized At Nagpur : सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुमारे 8 कोटी 81 लाख रुपयांचे 2 किलो 937 ग्रॅम अंमली पदार्थ (ड्रग्ज) जप्त केले आहे. अंमली पदार्थ तस्करी विरोधात सुरू असलेल्या मोहिमेतील ही सर्वांत मोठी कारवाई आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

Drug Seized At Nagpur
नागपूर ड्रग्ज जप्ती केस

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 4, 2024, 9:39 PM IST

नागपूरDrug Seized At Nagpur : येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज (4 एप्रिल) पकडण्यात आलेला ड्रग्ज तस्कर तामिळनाडू राज्यातील चेन्नई येथील रहिवासी आहे. ४५ वर्षीय इसम युगांडाहून दोहा मार्गे कतार एअरवेची फ्लाइट क्र QR-590 ने पहाटे नागपूर विमानतळावर आला. कस्टम अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे आधीच सापळा रचलेला होता. पॅक्स नावाचा व्यक्ती हा ग्रीन चॅनलवरून जात असताना त्याला अडवण्यात आल्यानंतर संशयाच्या आधारे त्याची झडती घेण्यात आली. यावेळी त्याच्या जवळ 8 कोटी 81 लाख रुपयांचे 2 किलो 937 ग्रॅम अंमली पदार्थ (ड्रग्ज) आढळून आले आहे.

डमी प्रोपेलर, दोन प्लेट आकाराच्या डिस्कमधून ड्रग्स तस्करी : नागपूर विमानतळावरील कस्टम्सच्या सतर्क आणि दक्ष अधिकाऱ्यांनी आरोपी प्रवाशाचे असामान्य वर्तन लक्षात घेतले होते. म्हणून अधिकाऱ्यांनी त्याची कसून तपासणी केली. ज्यामध्ये त्याच्या सामानात एक डमी प्रोपेलर आणि दोन प्लेट आकाराच्या डिस्कसह संशयास्पद वस्तू दिसून आल्या. डमी प्रोपेलर आणि डिस्क तपासण्यासाठी उघडून पाहिली असता यामध्ये पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचे पावडर भरलेले आढळून आले. ड्रग्ज डिटेक्शन किटच्या साहाय्याने चाचणी केली असता पांढऱ्या आणि पिवळ्या पावडरमध्ये मेथाक्वॉलोन आढळून आले. पॅक्सला अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, 1985 च्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली.

ड्रग्ज तस्करी करणारी बोट ताब्यात :ड्रग्ज तस्करीची अशीच एक घटना 24 फेब्रुवारी, 2024 रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे उघडकीस आली होती. यामध्ये गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं भारतीय नौदल आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) यांच्या संयुक्त कारवाईत गुजरातच्या किनारपट्टीवर संशयित इराणी बोट पकडली. या बोटीतून 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचं चरस आणि इतर अंमली पदार्थ बाळगणाऱ्या त्या बोटीच्या चार इराणी सदस्यांना ताब्यात घेतल्याची माहिती एका सूत्रांनी दिली.

3300 किलो अंमली पदार्थ जप्त : गुजरात एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं अंमली पदार्थांच्या बाबत माहिती दिली होती. ते म्हणाले की, "समुद्रात करण्यात आलेल्या कारवाईत बोटीतून चरससह विविध प्रकारच्या अंमली पदार्थांची मोठी खेप जप्त करण्यात आलीय. ही बोट किनाऱ्याच्या दिशेनं आणली जात होती. ती पोरबंदरला पोहोचण्याची शक्यता होती. अंदाजे 1,000 कोटी रुपयांचे 3300 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.

हेही वाचा :

  1. भटक्या विमुक्त जमाती संघटना, धनगर समाज, वंजारी समाजाच्यावतीने मविआ उमेदवारांना पाठिंबा, लक्ष्मण माने यांची घोषणा - Lok Sabha Election 2024
  2. अखेर कळसुबाई शिखरावरील तो वादग्रस्त फलक हटवला, सर्व महिलांना आता मंदिर दर्शनासाठी खुले - Kalsubai Controversy board removed
  3. भाजपाच्या वाढता दबावापुढं मुख्यमंत्री हतबल; विद्यमान ४ खासदारांची तिकिटं कापल्यानं तणाव वाढला - Lok Sabha Election 2024

ABOUT THE AUTHOR

...view details