महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 7, 2024, 10:43 PM IST

ETV Bharat / state

'डीआरआय'ने सोन्याच्या तस्करीचा केला पर्दाफाश, 16 किलो सोनं आणि दोन कोटी 65 लाख रोख रक्कम केली जप्त

DRI Team Raid : महसूल गुप्तचर संचलनालयाने (डीआरआय) सोन्याची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. ही कारवाई करत 16 किलो सोने आणि 2 कोटी 65 लाखांची रोख रक्कम जप्त केली आहे.

DRI Team Raid
सोन्याच्या तस्करीचा केला पर्दाफाश

मुंबईDRI Team Raid: सोन्याची तस्करी आणि ग्रे मार्केटमध्ये विक्री करण्यात एक सिंडिकेट गुंतले असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारावर, तस्करीच्या सोन्याच्या विक्री आणि खरेदीसाठी वापरल्या जाणाऱ्या जागेची 5 मार्च रोजी झडती घेण्यात आली. त्यावेळी 10.7 किलो परदेशातून तस्करी केलेले सोने (प्रामुख्याने बारच्या रूपातील) आणि सोने तस्करीच्या विक्रीतून मिळालेले १ कोटी ८ लाख रुपये जप्त करण्यात आले आहे.

घराची झडती घेतली अन् सापडले घबाड :झडतीदरम्यान, अधिकाऱ्यांनी सिंडिकेटच्या 2 सदस्यांना ओळखले आणि त्यांना रोखले. यापैकी एका सदस्याच्या निवासस्थानाची झडती घेण्यात आली, जो सिंडिकेटचा हँडलर होता. त्याच्या निवासस्थानी झडती घेतली असता तस्करीचे ३.७७ किलो वजनाचे सोने जप्त करण्यात आले. या कारवाईनंतर मिळालेल्या अधिक माहितीच्या आधारे, 5 मार्च रोजी सिंडिकेटच्या मुख्य सूत्रधारांच्या निवासस्थानी शोध पथक तैनात करण्यात आले. शोध पथकाला पाहताच मास्टरमाइंड त्याच्या 14व्या मजल्यावरील राहत्या घरातून तस्करीसाठी ठेवलेले सोने आणि फोन फेकण्यात यशस्वी झाला. मात्र, डीआरआयच्या शोध पथकाने या निवासस्थानातून 60 लाख जप्त केले.

मास्टरमाइंडची पत्नी देखील सक्रिय सदस्य :चौकशी दरम्यान, सूत्रधाराने त्याचे फोन आणि 2 विदेशी मूळ सोन्याचे बार फेकून दिल्याचे उघड झाले. सुमारे 15 तासांच्या छापेमारीत आणि पाठपुराव्यानंतर, 6 मार्च रोजी मास्टरमाईंडच्या गृहनिर्माण संस्थेच्या शेजारील 2 गृहनिर्माण सोसायट्यांमधील दोन रहिवाशांकडून 3 मोबाईल फोन आणि प्रत्येकी 1 किलोच्या 2 परदेशी सोन्याचे बार जप्त करण्यात आल्या. मास्टरमाइंडची पत्नी देखील सिंडिकेटची सक्रिय सदस्य आहे आणि कारमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याच्या अधिक माहितीवरून, 6 मार्चच्या पहाटे तिला पकडण्यासाठी एक पथक तैनात करण्यात आले होते. सुमारे 6 तासांच्या पाठलागानंतर तिला पकडण्यात आले. चौकशीदरम्यान, तिने उघड केले की, तिने मध्यरात्री तिच्या फार्महाऊसमधून तिच्या सहकाऱ्याच्या घरी तिजोरी लपवली होती. नंतर डीआरआयच्या पथकाने तिच्या सहकाऱ्याच्या घराची देखील झाडाझडती घेतली. ज्यामध्ये 6 किलो चांदी आणि 25 लाखांची रोकड जप्त करण्यात आली.

घटनेचा पुढील तपास सुरू :डीआरआयच्या पथकाकडून एकूण १६.४७ किलो तस्करीचे सोने आणि 10 कोटी 48 लाख तस्करीच्या सोन्याच्या विक्रीतून मिळालेली रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच एकूण 6 किलो चांदी आणि 2.65 कोटींची रोकड जप्त करण्यात आली असून सिंडिकेटच्या सूत्रधारांसह 6 जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा:

  1. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर अखेर महिला धोरण जाहीर, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
  2. भाजपाची राज्यात 35 जागांवर लढण्याची तयारी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला 'इतक्या' जागा?
  3. पूर्णा नदीत सापडलेल्या शिवलिंगाचे गढीच्या गुहेत दर्शन; अरुणेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

ABOUT THE AUTHOR

...view details