महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जॅकेटच्या खिशात लपवून आणलेलं करोडो रुपयांचं सोन जप्त; मुंबई विमानतळावर DRI ची कारवाई - Gold Seized On Mumbai Airport - GOLD SEIZED ON MUMBAI AIRPORT

Gold Seized On Mumbai Airport : मुंबई विमानतळावर 3.33 कोटी रुपयांचं साडेचार किलो सोनं जप्त करण्यात महसूल गुप्तचर संचालनालयाला यश आलं आहे. या प्रकरणी दोन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. ते सध्या डीआरआयच्या कोठडीत आहेत.

Gold Seized On Mumbai Airport
फाईल फोटो (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 18, 2024, 10:25 AM IST

मुंबई Gold Seized On Mumbai Airport : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 3.33 कोटी रुपयांचं साडेचार किलो सोनं जप्त करण्यात महसूल गुप्तचर संचालनालयाला यश आलं आहे. याप्रकरणी अबु धाबीवरून आलेल्या दोन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाचे अधिकारी प्रवीण जिंदाल यांनी दिली.

सोन्याची तस्करी : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर फ्लाइट क्रमांक EY 206 अबु धाबीहून येणाऱ्या दोन प्रवाशांना रोखलं. कस्टम ग्रीन चॅनल ओलांडल्यानंतर या दोघांना पकडण्यात आलं. दोघांची झडती घेतल्यावर एका प्रवाशानं परिधान केलेल्या जॅकेटच्या खिशात मेणात भुकटी स्वरूपातील सोन्याचे चार पॅकेट सापडली. हे जॅकेट अबु धाबीतील दुसऱ्या प्रवाशानं त्या प्रवाशाला परिधान करण्यास दिलं होतं. डीआरआयनं एकूण 4,525 ग्रॅम सोन्याची भुकटी जप्त केली आहे. ज्याची किंमत 3.33 कोटी आहे. सोनं हे सीमाशुल्क कायदा, 1962 च्या तरतुदींनुसार जप्त करण्यात आलं आहे. दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली. सध्या ते डीआरआयच्या कोठडीत आहेत.

यापूर्वी केलेली कारवाई : काही महिन्यांपूर्वी सीमा शुल्क विभागाच्या पथकानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांची झडती घेतली. या झडती दम्यान 5.71 कोटी रुपयांचं 9.482 किलो सोनं जप्त केलं होतं. प्रवाशांच्या हातातील सामानात आणि परिधान केलेल्या अंतर्वस्रांमध्ये खास डिझाइन केलेल्या पॅकेटमध्ये हे सोनं लपवून ठेवलेलं आढळून आलं होतं. यात एकूण आठ जणांना अटक करण्यात आली होती.

हेही

  1. विदेशातून सोन्याची तस्करी; मुंबई विमानतळावर तीन दिवसात 5.71 कोटींचं सोनं जप्त - Gold Seized by Customs
  2. सोने तस्करीचं वाढलं प्रमाण, चारच दिवसांत विमानतळावरून तीन किलो सोनं जप्त
  3. केनियातून भारतात सोन्याची तस्करी? दोन केनियन महिलांना मुंबई विमानतळावर अटक
  4. जेद्दाहहून मेणात लपवून आणलेलं 4 किलो सोनं मुंबई विमानतळावर जप्त; डीआरआयची कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details