महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरात उत्साह, चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी - Dr Babasaheb Ambedkar Jayanti

Babasaheb Ambedkar Jayanti: भारतीय घटनेचे शिल्पकार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडर यांची १३३ वी जयंती महाराष्ट्रासह देशभरात साजरी केली जात आहे. महामानवाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी चैत्यभूमीवर गर्दी केली आहे. देशभरात विविध कार्यक्रमांतून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे.

Babasaheb Ambedkar Jayanti 2024
Babasaheb Ambedkar Jayanti 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 14, 2024, 7:22 AM IST

Updated : Apr 14, 2024, 8:30 AM IST

मुंबई:डॉ. भीमराव (बाबासाहेब) आंबेडकर हे घटनातज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, राजकीय नेते आणि समाजसुधारक होते. त्यांनी सामाजिक विषमतेविरोधात लढा दिला. त्यांची देशभरात जयंती साजरी केली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त देशाची सद्यस्थिती आणि संविधानाबद्दल युवकांमध्ये जागृती आणण्यासाठी मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, काँग्रसचे नागपूर लोकसभेचे उमदेवार विकास ठाकरे आणि रश्मी बर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूरमध्ये संविधान पठण केलं जाणार आहे.

'भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार अशी ओळख असलेल्या प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ञ, विचारवंत डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील महू (आंबेडकर नगर) येथे झाला. त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील दादर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या समाधीचे स्थान 'चैत्यभूमी' म्हणून ओळखली जाते. महामानवाच्या जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी लाखो अनुयायी चैत्यभूमीला येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील एक्स मीडियाव पोस्ट करत महामानवाला अभिवादन केलं.

वंचित बहुजन आघाडीनं बाबासाहेबांना अभिवादन केलं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत महामानवाला अभिवादन केलं. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, " डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजात समता, न्याय व बंधुता ही मूल्ये रुजवून सामाजिक क्रांतीची मशाल पेटवली. शिक्षणाचे महत्त्व पटवून देत वंचित घटकांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन..!

डॉ. बाबासाहेबांच्या आयुष्याबाबत काही माहिती

  • डॉ. बाबासाहेब हे १४ भाऊ आणि बहिणींमध्ये सर्वात लहान होते.
  • 6 वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले.
  • आईच्या निधनानंतर त्यांच्या मावशीनं सांभाळ केला.
  • त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे भारतीय सैन्यात सुभेदार होते.
  • बाबासाहेबांनी सातारा येथील प्रतापसिंग हायस्कूल या सरकारी शाळेतून शिक्षण घेतले. 7 नोव्हेंबर 1900 मध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी चौथीपर्यंतचे शिक्षण घेतलं.
  • डॉ. आंबेडकरांनी 1907 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी त्यांचा विवाह झाला.
  • मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतले.
  • बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडून पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती.
  • 1913 मध्ये उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्यासाठी डॉ. आंबेडकरांची निवड झाली.
  • शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेबांच्या 'मूकनायक' वृत्तपत्रासाठी मदत केली.
  • 1915 मध्ये त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून एमएची तर दुसऱ्याच वर्षी याच विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली.
  • बाबासाहेब यांचे अर्थशास्त्रासह कायद्यातील योगदान पाहून त्यांच्या नावाचे कोलंबिया विद्यापीठात अध्यासनदेखील आहे. त्यांचे चरित्र विद्यार्थ्यांना शिकविलं जातं.
  • भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यात योगदान दिल्यानं या विद्यापीठानं त्यांना 1952 मध्ये LLD ची पदवी प्रदान केली.

हेही वाचा-

Last Updated : Apr 14, 2024, 8:30 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details