महाराष्ट्र

maharashtra

पुण्यात 20 हजार डॉक्टर संपावर, आरोग्यसेवा कोलमडली - Doctors strike in Pune

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 17, 2024, 5:46 PM IST

Doctors strike in Pune : कोलकातामध्ये सरकारी रुग्णालयात निवासी महिला डॉक्टरचा बलात्कार करून खून करण्यात आला आहे. याच घटनेच्या निषेधार्थ पुण्यात डॉक्टरांनी संप पुकारला आहे. त्यामुळं रुग्णालयांमधील सेवेवर परिणाम झाला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व रुग्णालये बंद ठेवण्याचा निर्णय "मार्ड" संघटनेनं घेतला आहे.

Doctors strike in Pune
पुण्यात 20 हजार डॉक्टर संपावर (Etv Bharat Reporter)

पुणे Doctors strike in Pune : कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज रुग्णालयातील एका महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आलीय. या प्रकरणामुळं देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. आज इंडियन मेडिकल असोसिएशन तसंच डॉक्टरांच्या संघटनांनी संप पुकारला आहे. त्यामुळं आज देशभरातील डॉक्टर संपावर आहेत. या संपात पुण्यातील 20 हजार डॉक्टरांनी सहभाग घेऊन कोलकाता घटनेचा निषेध केला. त्यामुळं पुण्यातील आरोग्य सेवा विस्कळीत झालीय.

डॉक्टरांच्या प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter)

सर्व रुग्णालये 24 तास बंद :पुणे शहरातील सर्व रुग्णालये 24 तास बंद असून केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता कोणतंही रुग्णालय ओपीडी सुरू ठेवण्यात येणार नाही, असा निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी घेतला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात इंडियन मेडिकल असोसिएशन तसंच विविध संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी जोरदार घोषणाबाजी केली. या संपात शहरातील 20 हजार डॉक्टर सहभागी झाले आहेत. तसंच पुण्यातील 900 रुग्णालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळं आरोग्य सेवेवर विपरित परिणाम होत आहे.

डॉक्टरांना सुरक्षा देण्याची मागणी : कोलकतामध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज बंद पुकारण्यात आल्याचं आंदोलक डॉक्टरांनी यावेळी बोलताना सांगितलं. सर्व डॉक्टरांना सुरक्षा मिळावी, अशी आमची मागणी आहे. घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. तसंच रुग्णालयांची सुरक्षा झोन म्हणून नोंद करावी, अशी मागणी डॉक्टरांनी केलीय.

रुग्णांची गैरसोय होणार नाही : कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरची अत्याचार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर निवासी डॉक्टरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळं निवासी डॉक्टरांनी 'काम बंद'चा इशारा दिला आहे. या घटनेमुळं शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यातील निवासी डॉक्टरांनी ‘काम बंद’ आंदोलनात सहभागी व्हावे, असं आव्हान महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेनं (मार्ड) केलं होतं. निवासी डॉक्टरांचा संप सकाळी नऊ वाजता सुरू झालाय. निवासी डॉक्टर आपत्कालीन सेवा वगळता इतर कोणत्याही सेवा आज देणार नाहीत. रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असं देखील मार्डनं स्पष्ट केलंय.

हे वाचलंत का :

  1. डॉक्टर तरुणी बलात्कार खून प्रकरण; आज देशभरात डॉक्टर संघटनांचा संप, महाराष्ट्रातील 'इतके' डॉक्टर संपावर - Doctor Rape And Murder Case
  2. डॉक्टर तरुणी खून बलात्कार प्रकरण : रुग्णालयात तोडफोड करणाऱ्या 19 जणांना अटक, डॉक्टर संघटनांचा संप सुरूच - Doctor Rape Murder Case
  3. डॉक्टर तरुणी खून प्रकरण : मार्ड डॉक्टरांचा संप, तर पुण्यातील 'ससून'मधील निवासी डॉक्टर संपावर - Kolkata Doctor Rape Murder Case

ABOUT THE AUTHOR

...view details