छत्रपती संभाजीनगर Doctors strike in Sambhajinagar :कोलकाता येथील रुग्णालयात महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराविरोधात जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स, संघटनांनी एक दिवसीय संप पुकारलाय. 750 रुग्णालयांतील सुमारे 3 ते 4 हजार डॉक्टरांनी आज सेवा न देण्याचा निर्णय घेतला. देवाचा दर्जा असताना आम्ही सुरक्षित का नाही? असा सवाल आंदोलक डॉक्टरांनी केला. अत्यावश्यक सेवा वगळता इतर उपचार एका दिवसासाठी बंद ठेवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या आंदोलनात मार्ड डॉक्टर्स, आयएमए, होमिओपॅथी, आयुर्वेद संघटना सहभागी झाल्या आहेत.
क्रांती चौकातील रस्ता जाम :कोलकात्यात महिला डॉक्टरच्या अमानुष अत्याचाराविरोधात डॉक्टरांच्या संघटनांनी एकत्र येत एक दिवसीय संप पुकारला. अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त शनिवारी सकाळी 6 ते रविवारी सकाळी 6 वाजेपर्यंत रुग्णालयातील उपचार बंद ठेवण्यात आले आहेत. दुपारी क्रांतीचौक परिसरात निवासी डॉक्टर तसंच खासगी डॉक्टरांनी ठिय्या आंदोलन सुरू केलय. या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी जोरदार घोषणाबाजी केली. मुख्य रस्ता अडवून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मात्र, डॉक्टरांनी घोषणाबाजी सुरूच ठेवत न्यायाची मागणी केली.