मुंबई Disha Salian Death Case : कोरोनाकाळात दिशा सालियन आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांचा संशयास्पद मृत्यू झाला. या दोन्ही आत्महत्या संशयास्पद असल्याचे म्हणत तक्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजापानं ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला होता. तसंच आदित्य ठाकरे यांच्यामुळे दोघांनाही जीव जमवावा लागला असा आरोप करत नितेश राणे यांनी हे प्रकरण सातत्यानं लावून धरलं. या प्रकरणी सीबीआयनं देखील तपास केला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटीची नेमणूक केली आहे. परंतु आता या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात 31 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे आमदार नितेश राणे हे या सुनावणी दरम्यान उपस्थित राहणार असल्यामुळे सर्वांच्या नजरा सुनावणीकडे लागल्या आहेत.
नितेश राणे सुनावणीला उपस्थित राहणार :आदित्य ठाकरे यांच्यामुळे दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत यांना जीव गमवावा लागला. त्यामुळे या प्रकरणात आदित्य ठाकरेच जबाबदार असल्याचा वारंवार नितेश राणे आरोप करताहेत. तसंच माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली होती. यानंतर पावसाळी अधिवेशना दरम्यान मुंबई पोलिसांनी नितेश राणे यांना चौकशीसाठी नोटीस बजावली होती. परंतु अद्याप नितेश राणे चौकशीसाठी गेले नाहीत. तसंच 8 जून 2020 रोजी दिशा सालियन, आमदार आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, सचिन वाझे आणि एकता कपूर यांचं मोबाईल लोकेशन तपासवं, असं सतत नितेश राणे मागणी करताहेत. मात्र, आता या प्रकरणाची 31 जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.